🌟परभणी जिल्ह्यातील जेष्ठ कॉंग्रेस नेते मा.मंत्री आ.सुरेश वरपुकर यांचा महविकास आघाडीच्या चर्चा समितीत समावेश करा......!


🌟कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी वहीद कुरेशी यांनी पूर्णा तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मांडला ठराव🌟

परभणी/पुर्णा :- परभणी जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री आ.सुरेश वरपुकर हे महाराष्टातील विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद असून त्यांनी एक वेळेस मंत्री पद,पाच वेळेस आमदार पद तर एक वेळेस खासदार पदासह नृसिंह सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनेक वर्षा पासून आ.वरपूडकर हे अध्यक्ष आहेत अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत सन १९७४ पासून आ.वरपूडकर हे राजकारणात सक्रिय आहेत.

         मराठवाड्यातील सर्व मतदार संघाच्या त्यांना पूर्ण अभ्यास आहे त्यांना राजकीय/सामाजिक क्षेत्राचा जवळपास ५० वर्षाचा अनुभव आहे मराठवाड्यात विधान सभेच्या ४६ जागा आहेत त्यात सर्वात जास्त काँग्रेसचे आमदार आहेत गेल्या लोकसभेत काँग्रेसने तीन जागा लढविल्या त्या तिन्ही जागा जिंकल्या म्हणजे १०० टक्के यश मिळाले असे असतांना देखील पक्षाने महाविकास आघाडीच्या जागा वाटप चर्चा समितीत मराठवाड्यातील एकही नेत्याचा  समावेश करण्यात आला नाही मराठवाड्यातील ४६ मतदार  संघातील एकही नेता या समितीत नसल्या मुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची भक्कम बाजू मांडण्या करिता या समितीत मराठवाड्यातील एकतरी नेत्याचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे नाही तर काँग्रेस पक्षाचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

   त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी याची दखल घेऊन जेष्ठ कॉंग्रेस नेते माजी मंत्री आ.सुरेश वरपुडकर यांचा या महाविकास आघाडीच्या जागा वाटप चर्चा समितीत समावेश करण्यात यावा अशी मागणी पुर्णा तालुक्यातील जेष्ठ कॉंग्रेस नेते वहीद कुरेशी यांनी पुर्णा तालुका काँग्रेस कमिटीच्या झालेल्या बैठकीत ठराव मांडून मागणी केली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथ भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस पक्षाचे तालुका निरीक्षक रवी सोनकांबळे,प्रल्हाद अवचार,जेष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष सलीम महमद साहब,माजी तालुकाध्यक्ष हमुंमत डाके,जिल्हा उपाध्यक्ष शिवसांभ देशुमुख, परभणी जिल्हा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष निखिल  धामनगावे,तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे,शेख अहेमद,रफिक कुरेशी,अमोल डाखोरे,दुधमाल,नसरुल्लखन,मा.नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड आदींसह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या