🌟आर्य वैश्य महासभा व देणं समाजाचं परिवाराच्या वतीने संत तुकाराम महाराज मंदिर व कणेरी पार्क परिसरात वृक्षारोपण🌟
पुर्णा (दि.२९ जुलै २०२४) :- महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुर्णा तालुका आर्य वैश्य महासभा व देणं समाजाचं परिवाराच्या वतीने श्री.संत तुकाराम महाराज मंदिर परिसरासह कणेरी पार्क परिसरात आज मंगळवार दि.३० जुलै २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास भव्य वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.
सदरील वृक्षारोपण पूर्णा-झिरोफटा-परभणी राज्यमार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरातील कणेरी पार्क या ठिकाणी आज मंगळवारी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास करण्यात आले या वृक्षारोपणानंतर अल्पोहराचे देखील आयोजन करण्यात आले होते या वृक्षारोपण सोहळ्यास पुर्णा तालुका आर्य वैश्य महासभा व देणं समाजाचं परिवारातील असंख्य मान्यवरांसह वृक्षप्रेमींनी सहभाग नोंदवला.......
0 टिप्पण्या