🌟शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले🌟
परभणी (दि.२९ जुलै २०२४) :- परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी पीक कर्ज,पीक विमा नुकसान भरपाई,नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी गुरुवार दि.०१ ऑगस्ट पासून पीक पेऱ्यांची अचूक नोंदणी आपल्या मोबाईल ॲपमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
सर्व शेतकऱ्यांनी शेतातील ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून ७/१२ वर पेरा केलेल्या विविध पिकाची नोंदणी करावी आता ही नोंदणी आपल्या मोबाईल ॲपमधून करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा हा पीक पाहणी प्रकल्प ०१ ऑगस्ट २०२४ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२४ करिता दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक पेऱ्याची अचूक नोंद करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.....
0 टिप्पण्या