🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन.....!


🌟माजी सैनिकांची प्रशासकीय पातळीवर असलेली कोणतीही कामे प्राधान्याने आणि तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी गावडे 


परभणी (दि.26 जुलै 2024) : सैनिकांचे जीवन अत्यंत खडतर असते. त्यामुळे माजी सैनिकांची प्रशासकीय पातळीवर असलेली कोणतीही कामे असतील तर ती प्राधान्याने आणि तातडीने पूर्ण करावीत. यापेक्षा महत्त्वपूर्ण काम कोणतेच असू शकत नाही, त्यामुळे प्रशासनातील सर्व अधिका-यांनी अशा देशभक्तांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त आज शहिदांना अभिवादन करण्यात आले आहे. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यावेळी उपस्थित होत्या 1999 मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धादरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावले आणि ऑपरेशन विजय या भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चोक्यांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांना यश मिळवले होते. दरवर्षी या दिवशी कारगील युद्धात शहीद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना अभिवादन केले जाते. आणि भारतीय सशस्त्र दलाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजित केले जाते.

याच अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी यांच्या वतीने 25 वा कारगिल विजय दिवस आज जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.  माजी सैनिक रामराव गायकवाड यांनी कारगिल विजय दिवसाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी लिपिक, कल्याण संघटक, जिल्ह्यातील वीर पत्नी, माजी सैनिक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येन उपस्थित होते.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या