🌟 महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कन्नड विधानसभा मतदार संघाचा दौरा.....!


🌟विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसंकल्प मोहिमेच्या माध्यमातून शिवसैनिकांशी साधणार संवाद🌟

✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर : शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शुक्रवार ता. १९ जुलै रोजी कन्नड विधानसभा मतदार संघाचा दौरा करणार आहे. संभाजीनगर जिल्हाव्यापी शिवसंकल्प मोहिमेच्या निमित्त शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून जनतेचे प्रश्न ऐकून जागेवरच मार्गी लावणार आहे. यावेळी आमदार उदयसिंग राजपूत हे उपस्थित राहणार आहे. 


सकाळी ९ वाजता चिंचोली - करंजखेड, सकाळी ११.३० वाजता चिकलठाण - पिशोर, दुपारी १ वाजता कन्नड अंधानेर, दुपारी ३ वाजता जेहुर -  चापानेर व दुपारी ४. ३० वाजता देवगांव - गल्लेबोरगांव येथील शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दानवे माहिती घेणार आहे शेतकरी व कष्टकरी जनतेच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्या या हेतूने तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना बैठकीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आलेली आहे.यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांनी प्रशासकीय पातळीवर असलेल्या आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटना, आजी माजी लोकप्रतिनिधी,शिवसैनिक व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, किसान सेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब मोहिते, तालुकाप्रमुख संजय मोटे, राजु वरकड, तालुका संघटक डॉ. आण्णासाहेब शिंदे, गणेश अधाने, शहरप्रमुख डॉ. सदाशिव पाटिल,महिला आघाडी उपजिल्हासंघटिका हर्षालीताई मुठ्ठे, तालुका संघटिका रुपलीताई मोहिते, युवासेना जिल्हाधिकारी उमेश मोकासे व तालुकाधिकारी योगेश पवार यांनी केले आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या