🌟जम्मू-काश्मीरात दहशतवादी हल्ले रोखण्यास केंद्र सरकार संपूर्णतः अपयशी....!


🌟शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा केंद्र सरकारवर घणाघात🌟 


✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर : दहशतवाद समोर आम्ही 56 इंचच्या छातीने लढणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला काहीही अर्थ नाही.वास्तविक देशांतर्गत मागिल १० वर्षात दहशतवादी हल्ले रोखण्यास केंद्र सरकार संपूर्ण अपयशी ठरल्याचा घणाघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. बुधवार ता. १७ जुलै रोजी शहरातील क्रांती चौक येथे शिवसेना संभाजीनगरच्या वतीने आयोजित निदर्शने दरम्यान ते बोलत होते

जम्मू - काश्मीर मध्ये दररोज अनेक भारतीय लष्करातील वीर जवानांचा दहशतवादी जीव घेत आहे. देशातील नागरीकांना फक्त त्यांना आदरांजली वाहावी लागत असून कलम ३७० हटवले तरीही दहशतवादी हल्ल्यामध्ये घट झाली नाही. दहशतवाद विरोधात ५६ इंचच्या छाती लढवू अशी केलेल्या घोषणाचे काय झाले ? असा प्रश्न दानवे यांनी नरेंद्र मोदी यांना विचारला दहशतवादी हल्ल्यात दररोज वीर जवान धारातीर्थ पडत असून अनेक नागरिकांचे आतापर्यंत जीव गेले आहेत. केंद्र सरकार यावर गप्प बसले असल्याने दहशतवाद्यांची हिम्मत वाढली असल्याची परिस्थिती आहे.देशभक्तांच्या हिंदुस्थानात देशद्रोहींचा शिरका होत असून धारातीर्थ पडलेल्या जवानांचा जीव केंद्र सरकार उघड्या डोळ्यांनी बघत असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी लगावला. 

      कित्येक वीर पत्नींचे सातत्याने कुंकू पुसले जात असताना काश्मीर मधील 370 कलम हटवल्याचा देशाला काहीही फायदा झाला नाही. केंद्र सरकार फक्त दहशतवाद मिटवल्याचा प्रचार करत आहे.शिवसेनेच्या नव्हे तर देशभक्तांच्या वतीने ही निदर्शने करण्यात आल्याची भूमिका दानवे यांनी मांडली जम्मू - काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असताना दहशतवादी निधड्या छातीने देशाच्या सीमेच्या आत घुसून लष्करातील जवानांचा जीव घेतात.यासाठी सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला.२०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले वाढले.देशांतर्गत असलेला संपूर्ण दहशतवाद मिटवला गेला पाहिजे अशी मागणी करत केंद्र सरकार फक्त दहशतवाद मिटवण्याचे आश्वासन देत असून प्रत्यक्षात काहीही करत नसल्याची टीका दानवे यांनी केली.

याप्रसंगी विभागीय सचिव अशोक पटवर्धन,माजी महापौर नंदकुमार घोडेले,सह संपर्कप्रमुख विजयराव साळवे, महानगरप्रमुख राजु वैद्य, कामगार सेना प्रभाकर मते, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, हिरा सालमपुरे, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, नितिन घोगरे, विजय वाघमारे, शिवा लुंगारे,आनंद तांदूळवाडीकर, शहरप्रमुख विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे,विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, शहर संघटक सचिन तायडे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी,सुशील खेडकर,दिग्विजय शेरखाने, माजी नगरसेवक सचिन खैरे,उपशहर प्रमख प्रमोद ठेंगडे,बापू पवार, विनायक देशमुख,जयसिंह होलिये, राजेंद्र दानवे,मनोज गांगवे,नंदू लबडे,विशाल राऊत, महिला आघाडी संपर्क सघटिका सुनिता आऊलवार, उपजिल्हा संघटिका दुर्गा भाटी,सुनंदा खरात,शहर संघटिका आशा दातार, सुनीता सोनवणे,विधानसभा संघटिका नलिनी महाजन,उपशहर सघटिका सुषमा यादगिरे, सुनिता औताडे,अरुणा भाटी,छाया देवराज, सविता निंगोळे, विजया पवार,मनीषा बिराजदार, सरस्वती सोनवणे,युवासेना जिल्हाधिकारी हनुमान शिंदे, शिवसेना दलित आघाडी शहर संघटक वैजिनाथ म्हस्के, अल्पसंख्याक शहर संघटक शेख असिफ,उपशहर संघटक राज चौथमल, सुभाष आठवले ,बाबुराव वाकेकर,विजय दाभाडे ,सुंदर साळवे,आदी उपस्थित होते उपस्थित होते.....

 ✍️. मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या