🌟परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांचे प्रतिपादन🌟
🌟धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या म्हणाल्या🌟
परभणी (दि.२२ जुलै २०२४) : परभणीतील अहिल्यादेवी होळकर विचार मंचतर्फे रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच निरनिराळ्या स्पर्धा परिक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शहरातील जागृती मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उद्घाटकीय भाषणात उपस्थितांना संबोधित करतांना परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर म्हणाल्या की केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व क्षेत्रातील ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत साखरे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रल्हाद खुणे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्रक्षिणार्थी) श्री विकास कुकडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महेश लांडगे, डॉ.ए.एल. शेळके, महेश पाटील, मौर्य क्रांती महासंघाचे संस्थापक बलभीम माथेले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रा. प्रसाद लेंगुळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सविस्तरपणे सांगितला. या कार्यक्रमांमध्ये परभणी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी वर्ग 5 वी व 8 वी नवोदय पात्र, एनएमएमएस, शिष्यवृत्तीधारक, दहावी, बारावी, नीट, सीईटी, जेईई, आय.आय.टी, एनआयआयटी, एमपीएससी व युपीएससी इत्यादी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात पांडुरंग कानडे यांच्यातर्फे कै. गणपतराव कानडे यांच्या स्मरणार्थ बारावी ‘नीट’ मध्ये धनगर समाजातून महाराष्ट्रात प्रथम आलेली कु. शिवलीला कुंभारगावे या विद्यार्थिनीस स्मृतीचिन्ह व रोख 10 हजार रुपये पारितोषिक दिले. तर जिल्ह्यातून 690 गुण घेऊन प्रथम आलेला पार्थ दत्तराव रोकडे या विद्यार्थ्यास रोख 2 हजार रुपये पारितोषिक व स्मृतीचिन्ह दिले. तसेच अशोक शिंपले यांच्यातर्फे कै. बबनराव महादू शिंपले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘नीट’मध्ये जिल्ह्यातून प्रथम आलेला पार्थ दत्तराव रोकडे यास रोख 5 हजार रूपये व स्मृतिचिन्ह देण्यात आले.
सूत्रसंचालन राजेंद्रकुमार तुडमे यांनी केले. आभार प्रदर्शन बालाजी कोकणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनंत बनसोडे, प्रसाद लेंगुळे, सुभाष शेंगुळे, विठ्ठल शेळके, मारुती काकडे, बालाजी कोकणे, माणिक काळे, राजेंद्रकुमार तुडमे, देविदास शिंपले, माणिकराव जुमडे, बलभीम माथेले, रमाकांत हेडे, शिवाजी गोजरटे, तुकाराम साके, शिवशंकर डोणे, प्रकाश रौंदळे, दत्ता गडदे, पांडुरंग कानडे, दामोदर आव्हाड, किशन शेळके, खोबराजी वाळवंटे इत्यादींनी सहकार्य केले.....
0 टिप्पण्या