🌟विशेषत: आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली🌟
पुर्णा शहरातील रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई संभाजी गायकवाड यांचं 01 जुलै 2024 रोजी कॅन्सरच्या आजाराने नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.त्यांच्या दुःखद निधनामुळे पूर्णा शहरांमध्ये फार मोठी शोककळा पसरली होती विशेषता: आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली.रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळाचे अध्यक्ष या नात्याने बुद्ध विहारांमध्ये व पूर्ण शहरांमध्ये जे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात त्यामध्ये आपल्या महिला मंडळासह सह त्या उपस्थित राहत अखिल भारतीय भिक्कु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथे रो पूज्य भदंत पय्यावंश, लातूर येथील सात कर्णी महाविहार येथील पूज्यभंते पैयानंद हिंगोली येथील पूज्य भन्ते विपश्यनाचार्य पैय्यारत्न बीड येथील पूज्य भंते धम्मशिल अजंठा धम्माचल येथील पूज्य भंते बोधीधम्मा यांच्या श्रद्धा संपन्न उपासिका म्हणून त्या सुपरिचित होत्या.
महामानव तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचा व कार्याचा प्रभाव असलेल्या वैभवशाली कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला कमालीची नीतिमत्ता सदाचार अंगी असलेल्या प्रेमळ व कष्टाळू आई सुभद्रा उर्फ बेलू बाई वडील शंकर कंधारे पोलीस खात्यामध्ये हेडकॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे अत्यावश्यक सेवेमध्ये राहूनही धम्म कार्यामध्ये अग्रेसर असणारे प्रचंड वाचन व लेखन महापुरुषांचा व समाज सुधारकांच्या विचारांचा त्यांच्यावर गहण प्रभाव होता. मूळचे परभणी जिल्ह्यातील बरसा या ठिकाणी राहणारे. निर्व्यसनी चरित्र संपन्न होते.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याप्रमाणे विजयाताई यांच्या विचाराची जडणघडण झाली 1980 च्या दशकामध्ये त्यांचा विवाह पालम तालुक्यातील फळा येथील रहिवासी असलेले संभाजी नामदेव गायकवाड यांच्यासोबत करून देण्यात आला संभाजी गायकवाड हे एम कॉम झालेले परंतु नोकरी नव्हती या बेकारीच्या कालखंडामध्ये विजयाताईंनी समर्थ साथ देण्याचे काम त्यांना केलं शिलाई मशीन द्वारे कपडे शिवणे हाताला लागेल ते काम करणे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे या पद्धतीने त्यांनी संसार चालविला पुढे संभाजी गायकवाड यांना जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी या बँकेत कॅशियर पदावर नोकरी मिळाली पुढे पदोन्नती द्वारे ते शाखाधिकारी झाले. नोकरीच्या निमित्ताने त्यांना अनेक गावांमध्ये शहरांमध्ये जावे लागले.त्या ठिकाणी तेथील बुद्ध विहार समाज मंदिरामध्ये धम्म प्रचार आणि प्रसाराचे कार्य त्यांनी केले अनेक ठिकाणी भगवान बुद्ध व त्यांचा धम्म हा ग्रंथ वर्षावासाच्या काळामध्ये त्यांनी लावला.
पूर्णा शहरात आल्यानंतर भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्मविचार गतिमान होताना त्यांना दिसले विहारात सहकुटुंब सहपरिवार त्या जाऊ लागल्या. भदत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळाची स्थापना धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिलांना सोबत घेऊन केली.विहाराला लागूनच भदंत उपाली थेरोनगर या ठिकाणी प्लॉट घेऊन दोन मजली परिवर्तन निवास बांधल पती बाहेरगावी नोकरीच्या निमित्ताने होते परंतु मुलावर धम्माचे संस्कार शिक्षणाचे संस्कार त्यांनी बिंबवले त्यांचे जेष्ठ चिरंजीव सचिन हे एलएलएम आहेत. दुसरे चिरंजीव भारत भूषण के एम ए इंग्लिश बीएड आहेत.तिसरे चिरंजीव स्वप्निल हे एम कॉम आहे. भारत सरकारच्या पोस्ट खात्यामध्ये ते नोकरीस आहेत चौथे चिरंजीव बुद्धभूषण हे बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आहेत पुणे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत सचिन यांच्या पत्नी जय शीला ह्या एमएबी एड आहेत तर भारत भूषण यांच्या पत्नी बारावी डीएड आहेत.
पूर्ण कुटुंबाला उच्चशिक्षित व सुसंस्कृत करण्याचं काम विजयाताई यांनी केले. सासर व माहेरच्या आप्तेष्ट व नातेवाईकांना प्रेमाची आपुलकीची सदाचाराची जिव्हाळ्याची वागणूक द्यायच्या आपल्या सासूबाई सारजाबाई यांच्यावर त्यांचा अतिव जीव.मृत्यूच्या एक दिवसा अगोदर शारदाबाई त्यांना भेटण्यासाठी दवाखान्यात गेल्या त्यावेळी त्यांनी त्यांना सांगितलं पूर्णा येथे जाऊन घरी पुरणपोळीचं जेवण करून जाऊ दिर मिलिंद आणि जाऊ सुनिता यांना मोठ्या वहिनी या नात्याने त्याने अगदी पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावला.
अंत्ययात्रेच्या वेळी पुण्यानुमोदन विधीच्या वेळी त्यांच्या सासूबाई सोजराबई जाऊ सुनिता त्यांच्या डोळ्याची अश्रू खंडत नव्हते यावरून त्या किती प्रेम करायच्या हे लक्षात येते पुण्यानुमोदन विधीच्या वेळी पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी आपल्या धम्मदेशने मध्ये विजयाताई गायकवाड यांच्या कुशल कर्मविशद केले.त्यांचा कुशल कर्माचा सुगंध आजही दरवळताना दिसत आहे दि.01 ऑगस्ट 2024 हा त्यांचा मासिक स्मुर्तिदिन त्यांच्या विचाराला व कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन...!
अभिवादक
श्रीकांत हिवाळे सर
मा.तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जिल्हा परभणी
0 टिप्पण्या