🌟त्यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ,चार मुले,सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे🌟
पुर्णा (दि.१९ जुलै २०२४) :- पुर्णा तालुक्यातील सुहागन येथील माजी सरपंच केरबाजी घनश्याम भोसले यांचे आज शुक्रवार दि.१९ जूलै २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले माजी सरपंच केरबाजी भोसले अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते सुहागा गावातील प्रत्येक सामाजिक/धार्मिक कार्यात ते अग्रभागी कायम राहत असत सामाजिक बांधिलकीचे सातत्याने भान जोपासत त्यांनी गावकऱ्याना एकजूट ठेवण्याचे काम त्यांनी केले.
अत्यंत स्वाभिमानी व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरबाजी भोसले यांनी आपल्या मुलांना मोठ्या कष्टाने उभे करून स्वाभिमानाने जगण्याचे शिकविले त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, चार मुले,सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे केरबाजी भोसले यांच्या जाण्याने गावाची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने सुहागन गावातील गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.....
0 टिप्पण्या