🌟परभणीत वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियानाचे शनिवार दि.२० जुलै रोजी उदघाटन...!


🌟आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून स्व.बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियानाचे आयोजन🌟 

परभणी (दि.२० जुलै २०२४) :- परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा)चे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियान संपूर्ण परभणी विधानसभा मतदार संघात राबविण्यात येणार असून या अभियानाची सुरुवात शनिवार दि.२० जुलै २०२४ रोजी करण्यात येणार आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत वचनानुसार मानवी जीवनाचा व वृक्षवल्लींचा संबंध अनादीकाळा पासून चालत आला आहे.सध्या वृक्षतोड ही पर्यावरण ऱ्हासासाठी व जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याने परभणीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियान मतदार संघातील  नागरिक, विविध संस्था, पर्यावरण प्रेमी व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबविण्याचा संकल्प आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केला आहे. आमदार डॉ.पाटील हे सातत्याने परभणीत सामाजिक उपक्रम राबवत असतात, आता त्यांनी पर्यावरण या विषयाकडे अधिक लक्ष दिले आहे. या अभियानात आपल्या घरासमोर परिसरात आपल्या घरातील जेष्ठांच्या पित्यर्थ, मुलाबाळांच्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, त्यासाठी विविध वृक्षांची रोपे घरी अथवा परिसरात आमदार डॉ.पाटील यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अभियानाची सुरुवात कौस्तुभ मंगल कार्यालय देशमुख हॉटेल जवळ येथे शनिवार दि.२० जुलै रोजी दुपारी ०१.०० वाजता होणार आहे. खासदार संजय जाधव व ईतर मान्यवरांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार असून या अभियानामध्ये मतदार संघातील नागरीकांनी सहभागी होऊन मतदार संघातील प्रत्येक घरासमोर एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन आमदार डॉ.पाटील यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या