🌟परभणीतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जिल्हाध्यक्षा मनिषा केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली निदर्शन🌟
परभणी (दि.३१ जुलै २०२४) : राज्यात महिलांवर अमानुषपणे होणार्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीतर्फे आज बुधवार दि.३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास परभणीत जोरदार निदर्शने करण्यात आली.
येथील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर जिल्हाध्यक्षा मनिषा केंद्रे, शहराध्यक्ष वनिता चव्हाण, कार्याध्यक्ष सलमा शेख,सेलू तालुकाध्यक्षा सौ. निर्मला लिपणे,आशा खिल्लारे, शेख रुकसाना, सीमा घनवटे, बिल्कीस शेख, सविता आंभोरे, संगीता भराडे, जिलानी बी सायरा बी, आशा साळवे, देवीबाई बोराडे, मंदाकिणी रेंगे, सुमेरा हमीद यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्यांनी उरण व शिळफाटा येथील दोन घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे, असे स्पष्ट करीत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांच्या अपयशाची जबाबदारी स्विकारावी व राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली.....
0 टिप्पण्या