🌟अशी माहिती परभणी शहराध्यक्ष रणजीत मकरंद आणि प्रमोद कुठे यांनी दिली🌟
परभणी (दि.३० जुलै २०२४) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात २५ जुलै रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथून सुरू झालेली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा गुरुवार दि.०१ ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्यात दाखल होणार आहे.
जिल्ह्यातील ढालेगाव येथे दुपारी ०१.३० वाजता ही यात्रा दाखल होणार आहे तेथून पाथरी शहरातील आष्टी फाटा,सोनपेठ पेट्रोल पंप, अण्णाभाऊ साठे चौक, भिम नगर कमान, पोलीस स्टेशन चौक, सेलू कॉर्नर मार्गे अंजली मंगल कार्यालया पर्यंत जाणार आहे. त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. तेथून ही यात्रा रत्नापूर मार्गे मानवत शहरातील महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावता माळी चौक, रूढी पाटी, ताड बोरगाव, पेडगाव मार्गे सायंकाळी परभणीतील विसावा कॉर्नर या ठिकाणी दाखल होणार आहे.
संध्याकाळी पाच वाजता वसमत रस्त्यावरील अक्षदा मंगल कार्यालयात जाहीर सभा होणार असून या सभेसाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष नागोराव पांचाळ, परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक अॅड. गोविंद दळवी, डॉ. धर्मराज चव्हाण, प्रा.डॉ. सुरेश शेळके, यात्रेचे समन्वयक अॅड. अविनाश भोसीकर, रमेश बारस्कर, इंजि. सुरेश फड, जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, तुकाराम भारती, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनिता साळवे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, सुमित भालेराव यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असणारे ओबीसीचे नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती परभणी शहराध्यक्ष रणजीत मकरंद आणि प्रमोद कुठे यांनी दिली.....
0 टिप्पण्या