🌟त्रिपुरातील हृदयविदारक घटना : 'ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस’ (HIV) मुळे ४७ विद्यार्थ्यांचा मृत्यू.....!


 🌟तर आतापर्यंत ८०० हून अधिक विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची नोंद🌟 

त्रिपुरातून एक हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. त्रिपुरात गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसची (HIV) लागण झाली आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (टीएसएसीएस) ने एका अहवालातून त्रिपुरातील धक्कादायक चित्र स्पष्ट केले आहे. “आम्ही आतापर्यंत ८२८ विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची नोंद केली आहे. त्यापैकी ५७२ विद्यार्थी अजूनही जिवंत आहेत, तर एचआयव्हीची लागण झालेल्या ४७ लोकांनी आपले प्राण गमावले आहे.

असे सरकारी संस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘एएनआय’ला सांगितले.“बरेच विद्यार्थी त्रिपुरा बाहेर देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी स्थलांतरित झाले आहेत,” असेही अधिकाऱ्याने नमूद केले आणि ‘एचआयव्ही’च्या वाढत्या प्रसारावर प्रकाश टाकला. ही बातमी अनेकांना आश्चर्यचकित करणारी असली, तरी हा प्रदेश अनेक वर्षांपासून एचआयव्ही संसर्गाशी झुंज देत आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या संचालक डॉ. समरपिता दत्ता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “एचआयव्ही संसर्ग येथे नवीन नाही. राज्यात दरवर्षी या प्राणघातक आजाराची १५०० प्रकरणे नोंदवली जातात.” परंतु, यामागचे कारण काय ? या प्रदेशात संसर्गाचा धोका का वाढत आहे ? 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या