🌟राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांची नाव नोंदणी करा - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟महसूल सप्ताहात योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिबिरांचे आयोजन🌟



परभणी (दि.26 जुलै 2024) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी महत्त्वाकांक्षी योजना सुरु केल्या असून, या सर्व योजनांमध्ये सांघिक जबाबदारीतून जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र लाभार्थ्यांची नावनोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज येथे कले. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते. 


व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे श्री. कुलकर्णी, सहायक आयुक्त प्रशांत खंदारे आदी यावेळी उपस्थित होते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत दहावी, बारावी आणि पदवी, पदव्युत्तर किंवा पदवीधारकांना सहभागी होण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये किंवा रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महास्वयंम संकेतस्थळावर मागणी नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेण्यात आला राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना,मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींना शिक्षण शुल्क 50 टक्केऐवजी 100 टक्के लाभ मंजूर करण्याची योजना अशा सर्व महत्त्वाकांक्षी योजनांचा जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी सांघिक जबाबदारीची भूमिका घेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांची नावनोंदणी करून घेण्याचे आवाहन केले. 

 जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खासगी आस्थापना,उद्योगामध्ये कार्य प्रशिक्षण योजनेत पात्र आणि सहभागी होण्यासाठी महास्वयंम या संकेतस्थळावर ऑनलाइन नाव नोंदणी करणे आवश्यक असून, या कार्य प्रशिक्षण योजनेत 6 महिन्यांपर्यंत कार्य प्रशिक्षण आणि विद्यावेतन मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापना, उद्योग, व्यवसाय, खासगी व्यावसायिक, साखर कारखाने, विविध कंपन्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विविध महामंडळे, जिल्हा परिषदेतील विविध विभाग, महानगरपालिका, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, खासगी रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, १६९२ अंगणवाडीमध्ये अंगणवाडीसेविका, मदतनीस, सरकारी कामगार कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रेल्वे, भारतीय डाक कार्यालय, नगर परिषद, महाराष्ट्र राज्य बी -बियाणे महामंडळ, बीएसएनएल, आरोग्य विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांवर प्रशिक्षण योजनेतून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले. 

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व शासकीय व खासगी आस्थापनांनी अ, ब, क नमुन्यात मनुष्यबळाची मागणी नोंदवावी. त्याचा अहवाल सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सादर करण्याच्या सूचना त्यांनी विभागप्रमुखांना दिल्या. 

*महसूल सप्ताहात योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिबिरांचे आयोजन*

जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महसूल सप्ताहामध्ये राज्य शासनाच्या सर्व योजनांचा समावेश करण्यात येणार असून, जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. त्यामध्ये सर्व योजनांचे लाभार्थी सहभागी होतील, याचे नियोजन करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी सांगितले. 

तसेच यावर्षी सर्व शासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापनांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवून कार्यालय परिसरात वृक्षारोपण करावे. वृक्षारोपण करताना रोपांची अडचण असल्यास रोजगार हमी योजना कार्यालयाकडे मागणी केल्यास ते निशुल्क उपलब्ध करून देण्यात येतील, असे उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीता सानप यांनी उपस्थित कार्यालय प्रमुखांना सांगितले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या