🌟उदया दिसेल स्मारक मोठे । दबल्या मातीत वाडा शोधू कोठे🌟
पुणे : पिंपरी चिंचवड पुणे येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाची सांगता झाली त्यात केळवद / चिखली जि.बुलढाणा येथिल कवी शाहीर मनोहर पवार यांनी 'भिडे वाडा या विषयाची मांडणी करणारी काव्य रचना सादर केली कवी विजय वडवेराव पुणे यांनी 'भिडेवाडा' देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव आयोजित केला होता त्यामध्ये महाराष्ट्र 'गोवा ' गुजरात ' कर्नाटक ' केरळ ' आदी ठिकाणांचे मान्यवर कवी यांनी सहभाग नोंदविला.
माय सावित्री तुला वंदन विजयाचे । तूच तर केले चंदन विजयाचे । आयोजक मा. विजय वडवेराव सर यांनी भिडेवाडा ,स्मारक होत असल्यानेच त्या निमित्ताने शिक्षणाच्या आद्य सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा उजाळा ' करण्या साठी . लोक चळवळ उभी केली . पिंपरी चिंचवड पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ' कवी ' शाहीर
मनोहर पवार यांनी भिडे वाडयाची वेदना विषद केली आहे. पहा - - भिडेवाडा उभा अनेक काळात । प्रेरणा घेती लाखो बहुजनात ।
झाली मूक वाणी ।
तर पुढे ते आपल्या काव्यात मांडतात - होता वाडा साक्षी संघर्षाचा ।
गेला मातीत अंत
झंझावाताचा ।
कोण सांगेल कहाणी ॥
सावित्रीचा संघर्ष आणि वास्तव मांडतात - बहुजन निरक्षर । घेतला साऊने पुढाकार ।
बहूजना थोर साक्षर ।
कर्मठांना सांगे साऊ
ठणकावूनी । अशाच प्रकारचे भाष्य त्यांनी आपल्या काव्यात मांडून वास्तव समोर आणले तसेच ' त्यांना साथ देणारे -
फातीमा बी होती
साऊ सोबत ।
रचला इतिहास
भिडेवाड्यात । सांगे मनोहर शाहीर कवणा तूनी । तसेच उदया दिसेल इथे स्मारक मोठे ।
दबल्या मातीत स्मृती
पाहू वाडा कोठे । शेवटी वाड्याचा ' शेवट वेदना ' स्मृती गतकाळ ' कवी मनोहर पवार केळवदकर यानी या काव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या