🌟मानवाला सर्वषक्तींषी जोडणारा दुवा ‘गुरू’ होय - सौ.शारदाताई वानेरे


🌟गुरू पोर्णीमेनिमित्त योग प्रषिक्षिका सौ.शारदाताई वानेरे यांचा हिरकणी प्रतिष्ठानच्यावतीने ॲड वृषालीताई बोंद्रेंनी केला सत्कार🌟     

✍️ मोहन चौकेकर    

चिखली : अज्ञानाच्या अंधारलेल्या अवस्थेतुन दैवी ज्ञानाचा दिवा लावतो, अनं त्याच्या बदल्यात काहीही घेत नाही तोच खरा गुरू अशी महंती गुरूजनांच्या संदर्भात गौरवाने चर्चीला जाते. मानवी जिवनामध्ये गुरूची गरज सतत भासत असते मग तो भुतकाळ, वर्तमान किंवा भविष्यकाळ असो. अध्यात्माबरोबरच सर्व शक्तींकडे नेण्याचा मार्ग दाखवतो तो म्हणजे मार्गदर्षक, शिक्षक, गुरू म्हणजेच आत्म्याला सर्व शक्तीमानाषी जोडणारा दुवा होय. त्याचप्रमाणे आंनदी, उत्साही, निरोगी जिवन जगण्याकरीता दैनंदीन जिवनात योग साधणेचे अन्यय महत्व असल्याचे प्रतिपादन प्रख्यात योग शिक्षीका सौ. शारदाताई वानेरे यांनी हिरकणी प्रतिष्ठाण व्दारा आयोजित सात दिवसीय निषुल्क योग षिबीर प्रसंगी केले. यावेळी सलग 20 वर्षापासुन निषुल्क योग साधणेचे प्रषिक्षण विविध शिबीरांच्या माध्यमातुन महिलांना देणा-या  सौ.शारदाताई वानेरे  यांचा हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने गुरूपोर्णीमा सणाचे औचित्य साधुन सत्कार करण्यात आला.

चुल आणी मुलांमध्ये गुरफटलेल्या असंख्य महिलांचे आपल्या आरोग्याकडे सतत दुर्लक्ष होत असते. परिणामी त्या विविध आजारांना त्या बळी पडतात. महिलांच्या जिवनात नवचैतन्य निर्मीती व्हावी म्हणुन गेल्या 20 वर्षापासुन सातत्याने आपण योग शिबीरांच्या माध्यमातुन महिलांचे जिवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रख्यात योग शिक्षीका सौ. शारदाताई वानेरे यांनी योग प्रषिक्षणार्थी महिला व युवतींषी संवाद साधतांना व्यक्त केले. हिकरणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांच्या हस्ते याप्रसंगी सौ. शारदाताई वानेरे यांचा गुरूपोर्णीमेच्या पावन पर्वावर सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा अॅड.सौ.वृषालीताई बोंद्रे म्हणाल्या की चुल आणी मुलांमध्ये गुरफटलेल्या असंख्य महिलांचे आपल्या आरोग्याकडे सतत दुर्लक्ष होत असते त्यामुळे विविध आजारांना त्या बळी पडतात. महिलांच्या जिवनात नवचैतन्य निर्मीती व्हावी म्हणुन हिरकणी तर्फे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या योग व आरोग्य शिबीरांच्या माध्यमातुन स्त्रियांचे आरोग्य विषयक समस्या सोडविण्याचा हिरकणी प्रतिष्ठानचा  प्रामाणीक प्रयत्न आहे. हिरकणी तर्फे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या योग व आरोग्य शिबीरांच्या माध्यमातुन स्त्रियांचे आरोग्य विषयक समस्या सोडविण्याचा हिरकणी प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 16 जुलै ते 22 जुलै 2024 या दरम्यान महिला व युवतींसाठी चिखली येथे सात दिवषीय योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सौ. शारदाताई वानेरे यांचा सत्कार प्रसंगी सौ. भारतीताई बोंद्रे, सौ. संगिताताई गाडेकर, सौ. अनिताताई भोजवानी, सौ. विद्याताई देषमाने, सौ. साधनाताई पेटकर, सौ. साधनाताई फितवे, सौ. नंदाताई भोजवानी, सौ. शालीनीताई वानखेडे, सौ. किरणताई बाहेती, सौ. मनिषाताई बोंद्रे, सौ. वनिताताई साखळकर, सौ.रेखाताई देषमुख, सौ. संध्याताई जाधव, सौ. गिताताई गाडेकर, सौ. रेणुकाताई गाडेकर, कु. दिपाली चाटे, माळेकर ताई, श्रीमती सताबाई धोटे, जिजाबाई म्हस्के, ढंगारी ताई, पाटील ताई, अवचार ताई, यांची उपस्थिती होती......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या