🌟परभणीत पत्रकारांच्या वतीने स्व.संजय कुमार कोटेचा यांना श्रद्धांजली.....!


🌟समाजहित व पत्रकारांच्या बळकट संघटीकरणाचे अधुरे कार्य पुर्ण करणे हीच कोटेचा यांना खरी श्रद्धांजली🌟  

🌟इराचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मदन (बापू) कोल्हे यांचे प्रतिपादन🌟

परभणी - सामाजिक कार्य व पत्रकारांचे हितासाठी जीवन समर्पित केलेले, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल चे राष्ट्रीय  सेक्रेटरी , क्ल्यू इंटेलिजन्स डिटेक्टीव्ह डिपार्टमेंट चे महाराष्ट्र व कर्नाटक चे संचालक,, महिला उन्नती संस्था (भारत) चे महाराष्ट्र प्रभारी, समाज कल्याण परिषद तसेच विविध संस्थांवर पदाधिकारी असलेले , ' कर्मयोगी ' संजय कुमार कोटेचा यांचे दि. 11 जुलै 2024 रोजी सांगली येथे आकस्मिक निधन झाल्याने पत्रकार व समाजाची फार मोठी हानी झाली आहे.

परभणी येथील जिंतूर रोड वरील समाजहित अभियान प्रतिष्ठाण चे कार्यालयामध्ये , विविध संघटनांचे वतीने संजयकुमार कोटेचा यांचे निधना निमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते .इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ,जेष्ठ पत्रकार मदन(बापू )कोल्हे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या शोक सभेमध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख तथा साप्ताहिक पोलखोल चे संपादक भगीरथ बद्दर, रुग्णहक्क समिती परभणीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे मीडिया पि.आर.ओ.  तथा  मा.विशेष कार्यकारी अधिकारी देवानंद वाकळे, (संपादक वैभवज्वाला,) समाजहित अभियान प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष ,दयावान सरकार व समाजहित न्यूज चॅनलचे संपादक प्रमोद आंबोरे ,अखिल भारतीय ग्राहक  पंचायत चे परभणी जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल रहीम, इरा चे परभणी महानगर अध्यक्ष मयूर मोरे  (देशमुख ),इरा चे किशोर कराळे, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संदीप वायव्ळ,रुग्ण हक्क समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज पठाण,हरदिप सिंग बावरी आदींची यावेळी उपस्थित लाभली होती .

यावेळी जेष्ठ पत्रकार भगीरथ बद्दर यांनी अत्यंत भावनाविवश होवून संजय कुमार कोटेचा यांच्या आठवणी सांगत आपला शोक व्यक्त केला, तसेच दिलीप बनकर ,देवानंद वाकळे,प्रमोद अंभोरे, अब्दुल रहीम यांनी संजय जी कोटेचा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी श्रद्धांजली पर भाषणे केली ,अध्यक्षिय समारोपात इरा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जेष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे यांनी संजय कुमार कोटेचा यांचे आकस्मिक निधनामुळे,त्यांचे सर्वसमावेशक समाजहिताचे, संपुर्ण महाराष्ट्रात 'इरा' परिवारात पत्रकारांना सामावून घेऊन त्यांच्या  हिताचे कार्य, पत्रकारांचे संघटनात्मक  बळकटी करण ,महिला उन्नती व त्यांचा सहभाग असलेल्या विविध संस्थांमधील त्यांची राहिलेली अधुरी कार्य पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन केले ,शेवटी दोन मिनिट सर्वांनी स्तब्ध उभे राहून संजय कुमारजी कोटेचा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या