🌟गोरसेनेची मागणी : विमुक्त जाती (अ) प्रवर्गामध्ये होणारी अवैध घुसखोरी तात्काळ थांबवा....!


🌟जिंतूर तहसीलदारांमार्फत गोरसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले निवेदन🌟

परभणी : परभणी जिल्ह्यातील जितूर तालुक्यातील गोरसेनेने विमुक्त जाती (अ) मध्ये होणारी अवैध घुसखोरी तात्काळ थांबवावी, अशी मागणी आज शुक्रवार दि.12 जुलै रोजी तहसीलदार याच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

             विमुक्त जाति (अ) प्रवर्गात अवैध  मार्गाने  खोटे जात  वैधता  प्रमाणपत्र  घेणार्‍या  लाभार्थ्यांसह खोटे  प्रमाणपत्र  वितरित करणार्‍या अधिकार्‍यावर कार्यवाही  करण्यासाठी विशेष तपासणी पथक  लागू करण्यात यावी,  संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा ठिकाणी जिल्हा जात वैधता पडताळणी समितीमध्ये  वि.  जा  (अ)  प्रर्वगातील एका  तज्ञ  व्यक्तीस  शासकिय  प्रतिनीधी  मह्ननुण नेमणुक  देण्यात  यावी, 2017 च्या महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेला रक्त नातेसंबंधाचा निकष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे शासन निर्णय  त्वरित रध्द  करण्यात यावा,  संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुका निहाय जिल्ह्याची यादी शासनामार्फत त्वरित जाहीर करण्यात यावी, राज्य मागास  अहवाल क्र  49/2014   लागु  करण्यात  यावा, महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जमातींना लागू केलेली उन्नत व प्रगत गटाची अट त्वरित रद्द करण्यात  यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर गोरसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

            दरम्यान, या वेळी विजय आढे, प्रविण चव्हाण, सुधाकर जाधव, संतोष राठोड, सचिन आडे, शिवाजी चव्हाण, अँड. विष्णू जाधव, भगवान वाटणे, संतोष आढे, संजय आढे, पिंटू चव्हाण, रामा राठोड, अर्जुन जाधव, बालाजी जाधव, विलास चव्हाण सह मोठ्या संख्येने गोरसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या