🌟'स्टॉप डायरिया' विशेष अभियान यशस्वी होण्यासाठी जिल्हा,तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेने समन्वय ठेवावा....!


🌟वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे प्रशासकीय यंत्रणांना निर्देश🌟 

🌟वाशिम जिल्हास्तरीय स्टॉप डायरिया कॅम्पिंगचे  उत्साहात उद्घाटन🌟


फुलचंद भगत

वाशिम:-कुपोषणमुक्ती या अभियानात वाशिम जिल्हा राज्यात प्रथम आला आहे ही बाब निश्चितच आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाचा उत्साह वाढवणारी आहे.  आता 'स्टॉप डायरिया' या मोहिमेचा आजपासून   जिल्ह्यात शुभारंभ होत आहे.हे अभियान ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी या अभियानाला उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आज येथे केले.   


    
                    अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. किंबहुना बालमृत्यू होणार नाही यासाठी प्रत्येक यंत्रणेने सजग असावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी केले.  अतिसार थांबवा (स्टॉप डायरिया) हे विशेष अभियान  यशस्वी होण्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेने समन्वय ठेवावा, अश्या सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिल्या. रॅकेट सपोर्टेड सेल्फ केअर फॉर न्यु मॉम ऍन्ड किड्स अंडर ५ प्रोजेक्ट,  जिल्हा आरोग्य विभाग, जल जीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद वाशिमच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्टॉप डायरिया कॅम्पिंगचे आयोजन १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृह येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. 

      अतिरिक्त मुख्य कार्यकारी सुनील निकम , जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस ठोंबरे, प्लान इंडिया  प्रोजेक्टच्या चीफ ऑफ पार्टी, प्लान इंडिया डॉ. कोमल गोस्वामी,मालेगाव तालुका अधिकारी डॉ अश्विनी खासबागे, मानोरा तालुका अधिकारी डॉ.महेंद्र चाफे यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री. निकम म्हणाले, मागील काही दिवसांत जिल्ह्यातील शेलूबाजार, वनोजा आणि कामरगाव येथे अतिसाराची साथ पसरली होती. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे.

 वैयक्तिक स्वच्छता, पावसाळ्यात होणारे आजार आणि आवश्यक खबरदारी यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आरोग्य कर्मचारी विद्यार्थ्यांना जलजन्य आजारांबाबत प्रबोधन होणे खूप गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने गावात होणार पाणीपुरवठा योजनेवर लक्ष ठेवावे.जेणेकरून दूषित पाणीपुरवठा होणार नाही. प्रतिबंधात्मक उपाय माहिती असायला हवेत. गावात कोणतीही साथ पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी.

     डॉ.कोमल गोस्वामी यांनी सेल्फ केअर प्रोजेक्टची माहिती दिली.त्या म्हणाल्या, प्लान इंडीया जिल्ह्यात अतिसार नियंत्रण मोहीमे साठी काम करत आहे.नियोजित विविध उपक्रमांची रूपरेषा सांगितली ज्यामध्ये पिण्याचे पाणी व्यवस्थापन, स्वच्छता शिक्षण आणि शालेय जनजागृतीचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितलेश्री. साहू म्हणाले, अतिसार थांबवा या अभियानात जिल्हा परिषद आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, आरोग्य, ग्रामपंचायती यांसारख्या विभागांचा समावेश असलेल्या सहयोगी प्रयत्नांची माहिती दिली.या मोहीमेदरम्यान गावपातळीवर वेगवेगळे उपक्रम आयोजित करून जनजागृती करावी असे सांगितले. जिल्ह्यात कुठेही दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची काळजी घ्यावी. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. असेही ते म्हणाले. 

    डॉ.ठोंबरे म्हणाले,  अतिसार कशामुळे झाला आहे हे शोधून त्यावर उपचार करण्याने शरीरातील महत्त्वाचे क्षार आणि पाणी शरीरातून बाहेर जाणे थांबते. पाण्याचे शरीरातून होणारे उत्सर्जन दीर्घकाळ चालू राहणे घातक आहे. पण त्याच वेळी शरीरात अनावश्यक असलेला घातक पदार्थ बाहेर जाणे हा घातक पदार्थ बाहेर टाकण्याचा आवश्यक मार्ग असू शकतो. अतिसार बरा करण्याचा परिणामकारक मार्ग म्हणजे आतड्यातील जिवाणूची पूर्ववत वाढ करण्यास मदत करणे होय. वैयक्तिक स्वच्छता महत्वाची आहे. शरीरातील झिंक (जस्त) कमी झाले असल्यास अतिसार दीर्घकालीन अतिसारामध्ये बदलतो. कुमारवयीन रुग्णामध्ये झिंक दिल्याने त्यांची वाढ पूर्ववत होते. भरपूर द्रवपदार्थ, दिल्याने शुष्कता येत नाही. जिल्ह्यात कुठेही अतिसार, मिझल्स ,रूबेलाची साथ पसरणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. असे आवाहन केले.

    श्रीमती अफुणे म्हणाल्या, या मोहीमेदरम्याननियोजित विविध उपक्रमांची रूपरेषा सांगितली ज्यामध्ये पिण्याचे पाणी व्यवस्थापन, स्वच्छता शिक्षण आणि शालेय जनजागृतीचा समावेश आहे. आम्ही स्वच्छता कार्यक्रमांची योजना आखत आहोत, पाण्याची गळती शोधणे आणि दुरुस्त करणे, साठे तपासणे, टाक्या (घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही) साफ करणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यास प्रोत्साहन द्यावे. आशा स्वयंसेविकांनी गृहभेटीदरम्यान डायरिया होणार नाही. झाल्यास घरघुती प्रतिबंधात्मक उपाय सांगावे. 

कार्यक्रमादरम्यान ओआरएस जलसंजीवनी व झिंक कॉर्नर आणि सेल्फ केअर आयईसी बुकपत्राचे अनावरण करण्यात आले. तसेच अतिसार नियंत्रण प्रतिबंधात्मक किटचे वितरण सुध्दा करण्यात आले. उपस्थित आशा स्वयंसेविकांना प्रतिबंधात्मक उपाय असलेल्या पॉम्पलेटचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन प्लॅन इंडिया स्टेट मॅनेजर दिनेश प्रजापती, असिस्टंट मॅनेजर सिमरन कठैत,स्टेट मॅनेजर गुजरात डॉ.चंद्रदीप रॉय ,डिस्टिक लीड  वाशिम धनश्री श्रीमंतवार ,प्रोजेक्ट कॉर्डिनेटर सूरज पवार ,ब्लॉक ऑफिसर मालेगांव भूषण कोल्हे व प्लान इंडिया सेल्फ केअर प्रोजेक्टच्या कम्युनिटी हेल्थ वर्कर ( गुलाबी दीदी) आदी उपस्थित होते. आभार डॉ. अश्विनी खासबागे यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या