🌟संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे देखील करण्यात येणार वाटप🌟
पुर्णा (दि.३१ जुलै २०२४) :- मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या गुरुवार दि.०१ ऑगस्ट २०२४ रोजी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पुर्णा शहरात विविध जनहीतवादी ंकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास पुर्णा शहरातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा बसवेश्वर,छत्रपती संभाजी महाराज आदीं महापुरुषांच्या स्मारकास अभिवादन करून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.
यानंतर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सकाळी ०९.३० वाजेच्या सुमारास मुळेंचा मारुती मंदिर या ठिकाणी तर १०.०० वाजता वरदानी मारुती मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे तर दुपारी १२.०० वाजता महिलांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दुपारी ०१.०० वाजता लखन ठाकूर यांच्याकडून महादेव मंदिर परिसरातील अंगणवाडी शाळेत खाऊ वाटप,सकल मराठा समाजाच्या वतीने माध्यमिक शाळेतील गरीब,कष्टकरी,गरजू,दहा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट वाटप,अंगणवाडीत महापुरुषांच्या प्रतिमा भेट आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.......
0 टिप्पण्या