🌟महिलांनी आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज - स्वाती घोडके


🌟मौजे मांडाखळी येथे महिला शेतकऱ्यांना भाजीपाला किट वाटपावेळी मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या🌟 


परभणी :- परभणी तालुक्यातील मौजे मांडाखळी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत,प्रकल्प संचालक आत्मा परभणी,दौलत चव्हाण, उप प्रकल्प संचालक आत्मा परभणी प्रभाकर बनसावडे तसेच तालुका कृषी अधिकारी परभणी, नित्यानंद काळे  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी स्वाती घोडके यांनी मौजे.मांडाखळी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत स्थापन असलेल्या नवतेज शेतकरी महिला स्वयंसहाय्यता अन्नसुरक्षा गटाला भाजीपाला किट वाटप करून परसबाग तयार करून भाजीपाला लागवड करण्याचे आवाहन केले आहे.


यावेळी परसबाग कशी तयार करायची याबद्दल माहिती देऊन गटाला  नोंदवह्या गटस्थापनेनंतर नोंदवही मध्ये बचत,व्याज,गटाच्या बैठकीबद्दल तसेच अधिकारी कर्मचारी यांना गटाला भेट दिल्यास अभिप्राय या सर्व बाबतीत लिखापडी कशाप्रकारे करायची याविषयी प्रत्येक नोंदवहीची सविस्तर माहिती देऊन महिलांना गटांतर्गत कोणकोणते गृह उद्योग सुरू करता येतील याविषयी सविस्तर माहिती दिली,गटाच्या बैठकी प्रत्येक महिन्याला वेळोवेळी घेण्याचे आव्हानही केले,शेतकरी महिलांचे आरोग्य चांगले असेल तर सर्व कुटुंबाचे आरोग्य चांगले असते म्हणून तृणधान्यापासून कुठले पदार्थ तयार होतात आणि ते कशाप्रकारे तयारकरायचे यासाठी  प्रकल्प संचालक आत्मा परभणी दौलत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तृणधान्यापासून तयार होणारे पदार्थांची माहिती पुस्तिका वाटप करण्यात आल्या अशाप्रकारे नवतेज  गटाचे गट प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरितेसाठी अलका डोळसे,अर्चना सोनटक्के, अंजली सोनटक्के यांनी मदत केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या