🌟या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.नायक यांची उपस्थिती🌟
फुलचंद भगत
वाशिम :- वाशिम येथील जिल्हा रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्ष अंतर्गत दि.११ जुले २०२४ रोजी मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.शिवाजी विद्यालय ,मोप ता. रिसोड या ठिकाणी शालेय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.नायक, तर प्रमुख पाहुणे म्हणून रिसोड तालुका. गटशिक्षणाधिकारी मा.कोकाटे, श्री.पाचरणे ऊपस्थित होते, श्री.विशाल गायकवाड (ग्रा.रू.रिसोड) तंबाखू ,बिडी ,सिगारेट ,गुटखा या सारख्या तंबाखू जन्य पदार्थामुळे मानवी शरिरावर होणारे दुष्परिणाम , तोंडाचा कर्करोग , तोंडाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, तंबाखू मुक्त शाळा बाबत तंबाखू नियंत्रण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ते श्री.रामकृष्ण धाडवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या वेळी गटशिक्षणाधिकारी कोकाटे सर यांनी समाजात आज तंबाखू जन्य पदार्थ सेवानाचे घातक व्यसन जडलेले दिसत आहे.तंबाखू सेवन करणे शरीरासाठी घातक असून तंबाखू जन्य पदार्थ अति सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. यावर आळा घालण्यासाठी शालेय स्तरावर तंबाखू मुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या समाजविघातक व्यसनाची जाणिव जागृती समाजातील व्यक्ती पर्यंत पोहचली पाहिजे असे मत व्यक्त केले.....
0 टिप्पण्या