🌟यावेळी अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांचा साडीचोळी व सन्मानपत्र देवुन सत्कार🌟
फुलचंद भगत
वाशिम - लॉ. डॉ. वसंतराव धाडवे मित्र मंडळ वाशिम व नंदिग्राम लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड, कायाकल्प फिटनेस सेंटर मंगरुळपीर व लॉयन्स क्लब मेन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगरुळपीर येथील केमिस्ट भवन येथे गुरुवार, १८ जुलै रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे व अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांचा साडीचोळी व सन्मानपत्र देवुन सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
रंजल्या गांजल्यामध्ये देव पाहणारे तथा वाशिम-मंगरुळपीर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी, शेतकर्यांसाठी शासनाच्या विविध योजना, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, एमआयडीसीमध्ये मोठे प्रकल्पाचे नियोजन करून विकासाचा ध्यास असणारे लॉ डॉ. वसंतराव धाडवे यांच्या आग्रहास्तव हे शिबीर ठेवण्यात आले. या शिबिरामध्ये नेत्र, कान, नाक, घसा, दंत तथा शुगर, बीपी तपासण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते तसेच यावेळी मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणार्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांचा सत्कार व साडीचे वाटप केले. या शिबिरात ज्या रुग्णांच्या डोळ्यातील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, अशांची निवड करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही नंदिग्राम लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड येथे मोफत होणार असून,रुग्णांना वाशीम ते नांदेड जाणे-येणे, भोजन व राहणे, शस्त्रक्रिया, लेन्स व चष्मा इत्याही मोफत दिल्या जाणार आहे......
0 टिप्पण्या