🌟आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या🌟
फुलचंद भगत
वाशिम :- कारंजा येशील देशमुख मंगलम कार्यालय येथे प्रणित मोरे यांनी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार आयोजित केला होता त्यांच्या सत्कार कार्य प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा राष्ट्रीय संस्थेतर्फे महाराष्ट्र समाजसेवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कन्या प्रिया राऊत यांचाही सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळा कार्यक्रम प्रसंगी राऊत म्हणाल्या की सरपंच हा गावगाड्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे प्रत्येक सरपंचांनी पेरे पाटील यांचा आदर्श घ्यावा व गावाची प्रगती करावी. तसेच गावातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होइल तेव्हढी मदत करावी.आदर्श गाव करायचे असेल तर पहिले गावातील प्रत्येक समाजातील मुला -मुलींना सुशिक्षित केले पाहिजे ,गावाचा विकास करण्यास हेच विद्यार्थी पुढे गावाचा विकास साध्य करु शकतात तसेच गावातील सामाजिक कार्यात सर्वांनी सहकार्य करावे जेणेकरून गावात तंटा होणार नाही तसेच राजकीय पक्षाच्या आखलेल्या डावपेच हा गावाचे विकासात अडथळा तयार करु शकतो या पासून गावातील जनतेने दक्ष राहिले पाहिजे तसेच गावातील प्रत्येक पदाधिकारी यांनी गावातील विकासासाठी एकजुटीने काम केल्यास गावाची प्रगती होऊन गावं आदर्श व्हायला वेळ लागणार नाही असेही त्या पुढे म्हणाल्या......
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशीम
मो.8459273206
0 टिप्पण्या