🌟आमदार डॉ. राहुल पाटील यांचे खंदे समर्थक अरविंदकाका देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले भुमिपुजन🌟
यासंदर्भातील थोडक्यात इतिहास असा की, महाराष्ट्र आणि देशात लहुजीबाबांचा पुतळा सर्वात प्रथम कुठल्या शहरात उभारलेला असेल तर त्या शहराचं नाव आहे परभणी. कदाचित त्यामुळेच "जगात जर्मनी आणि भारतात परभणी" अशी म्हण रूढ झालेली असावी. नगर परिषद परभणी यांच्या वतीने बसविलेल्या पुतळ्याचे शिल्पकार होते मारुती दाढेल. शिल्प जरी दगडी असले तरी अत्यंत आखीव रेखीव असा तो पुतळा आहे. सदरील पुतळ्याचे लोकार्पण 8 जानेवारी 1978 रोजी परभणीचे खासदार तथा नगराध्यक्ष शेषराव(भाऊ) देशमुख यांच्या हस्ते तर सांगलीचे आमदार तात्यासाहेब भिंगारदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात करण्यात आले. 46 वर्षांपूर्वी उभारलेला पुतळ्याची झीज होऊ लागली त्यामुळे शहरातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसापूर्वी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याकडे जाऊन क्रांतिवीर लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून द्यावा असा आग्रह धरला. या कामी माजी नगरसेवक माऊली साळवे यांच्या पुढाकारातून आलेल्या शिष्टमंडळाचा सन्मान राखत आमदार डॉ. राहुल पाटील यांनी स्वखर्चातून पूर्णाकृती पुतळा उभारून देण्याचा शब्द दिला. शिल्पकार शोधून त्यांना परभणीत पाचारण केले. पुणे येथील ख्यातनाम शिल्पकार मंगेश यांना परभणीत बोलावून घेतले, जागा दाखवली आणि त्या प्रमाणे पुतळ्याची ऑर्डर दिली. शिल्पकार मंगेश यांनी क्रांतिवीर लहुजी साळवे यांचा धातूचा पुतळा तयार केला आहे. त्या पुतळ्याचे फाउंडेशन बांधकाम आजपासून सुरू झाले आहे. भूमिपूजन करण्यासाठी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते झाले पाहिजे असा लहुजीनगर वासियांचा आग्रह होता. परंतु आमदार डॉ. राहुल पाटील यांची प्रकृती अचानक खराब झाल्यामुळे त्यांनी त्यांचे खंदे समर्थक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद काका देशमुख यांना पाठवून दिले. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या आग्रहाखातर आजच त्या कामाचे भूमिपूजन झाले आणि बांधकाम सुरू झाले आहे. येत्या काही दिवसात फाउंडेशन तयार होईल आणि एक ऑगस्टपर्यंत पुतळा उभा राहील आणि त्याचे लोकार्पण होईल असा अंदाज आहे. आजच्या या प्रसंगी माजी नगरसेवक माऊली साळवे, लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे, मूर्तिकार मंगेश, इंजिनियर गौरव तपके, कॉम्रेड उत्तम गोरे, कॉम्रेड अशोक उबाळे, पप्पू वाघमारे, जनार्दन बारसे, अशोकराव शिंदे, संपतराव आगळे, प्रकाश शिंदे, दिगंबर जाधव, विकास गोरे, हिरामण साळवे, सिद्धांत भिसे, तथागत झोडपे, संविधान भिसे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या