🌟जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित....!


🌟कार्यालयीन वेळेत प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे🌟

परभणी (दि.26 जुलै 2024) :- भारतीय समाजात रुजलेल्या अनिष्ठ प्रथांमुळे अनेकांचे होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी व मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी समाज प्रबोधनासोबतच, त्यावर प्रतिबंध घालून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसिद्धीचे कार्य करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

तरी इच्छुक स्वंयसेवी संस्था व महिला, पुरुष व्यक्ती यांनी जिल्हा स्तरावर जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसिद्धीचे कार्य करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. हे प्रस्ताव त्यांनी सर्व कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय, डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड परभणी येथे कार्यालयीन वेळेत प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या