🌟शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उपजिल्हाधिकारी मा.घुगे यांच्या समोर मांडल्या असता त्याच्याशी सकारात्मक चर्चा झाली🌟
फुलचंद भगत
वाशिम :- सन 2023 - 2024 च्या रब्बी हंगामात शेलूबाजार मंडळातील वनोजा,भूर,माळशेलू,नांदखेडा इत्यादी गावात वादळी वाऱ्यासह,मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती.यामधे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शेकडो शेतकऱ्यांनी पीकविमा काढला नुकसान झाल्याची तक्रार ऑनलाईन दाखल केली होती.मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाली नाही.याच मागणीसाठी आज वनोजा येथील शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासह,पीकविमा कंपनीच्या कार्यालयावर धडकले.
शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उपजिल्हाधिकारी मा.घुगे यांच्या समोर मांडल्या असता त्याच्याशी सकारात्मक चर्चा झाली.तसेच पीक विमा कंपनीचे मा.देशमुख यांनी येत्या 3 तारखेपर्यंत आम्हाला वेळ द्या योग्य पाठपुरावा करून मदत देऊ असे आश्वासन दिले.येत्या 3 तारखेपर्यंत योग्य निर्णय झाला नाही तर कठोर पाऊले उचलू असे शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी वनोजा व इतर गावातील शेकडो शेतकऱ्यांची ऊपस्थीती होती.....
0 टिप्पण्या