🌟वाशीम येथे सकल मातंग समाजाची विधानसभा निवडणुकी संदर्भात इच्छुक उमेदवाराची महत्वपूर्ण बैठक संपन्न.....!


🌟या बैठकीचे आयोजन अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद लगड यांनी केले होते🌟

फुलचंद भगत

वाशिम :- दिनांक 28 जुलै 2024 रविवार ला शासकीय विश्रामगृह येथे वाशिम मंगरूळपिर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मातंग समाजाच्या इच्छुक उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक ल.स.क.म.चे जिल्हा अध्यक्ष सुतार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या बैठकी मध्ये येणाऱ्या वाशिम मंगरूळपीर विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाचा जो इच्छुक उमेदवार  उमेदवारी (तिकीट) आणलं त्या व्यक्ती किंवा त्या उमेदवारा सोबत सर्व मातंग समाजाचे संघटनेचे प्रमुख सर्व इच्छुक उमेदवार सर्व समाजातील कार्यकर्ते सर्व क्षेत्रातील सर्व मंडळी त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील, आणि जर कोणत्याच पक्षाने जर मातंग समाजाला उमेदवारी दिली नाही तर सर्व मिळून एक अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी उभा करून आमची वेगळी ताकद दाखवून देऊ, असा ठराव एक मताने मंजूर झाला बैठकीला प्रा. संजय खिल्लारे जामठीकर, केशव डाखोरे( मा.जि.प.सदस्य.) भारत अंभोरे (विदर्भ संघटक) इंजी.राजू मानमोठे , अनिल कांबळे (मा.जि. प.सदस्य,) बाळासाहेब जोगदंड,उदेभान लांडगे कैलाश थोरात नेते लहुजी शक्ती सेना, आत्माराम सुतार नेते राष्ट्रीय लहू शक्ती, संजय वैरागडे( नेते अ.भा. मा.स.) नारायण डाखोरे कॉन्ट्रॅक्टर, प्रल्हाद लगड जिल्हा अध्यक्ष (abs फोर्स) कैलास रणशिंगे, संभाजी सावळे, आर के पाटोळे ( जिल्हा अध्यक्ष अ.भा. मा.स.) विलास खंदारे (जि.संघटक) विजय मानमोठे,(मा.जि. प.सदस्य,) अजय  रणखांब पुतळा समिती अध्यक्ष, इत्यादी उपस्थित होते.या बैठकीचे आयोजन अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स चे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद लगड यांनी केले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या