🌟पुर्णा तालुक्यातील सुहागण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नामदेव भोसलेला श्रेया परीक्षेत सुवर्णपदक....!


🌟जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांच्या हस्ते नामदेव भोसलेसह आई-वडिलांचा करण्यात आला सत्कार🌟 

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील सुहागण येथील आय.एस.ओ.मानांकन प्राप्त व डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नामदेव पुरभाजी भोसले या विद्यार्थ्यांने श्रेया परीक्षेत सुवर्णपदक पटकावले. नामदेवने भोसलेने तालूक्यात ७ वा तर राज्यात २१ वा क्रमांक पटकावला जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवार दि.१६ जूलै २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुहागन येथे नामदेव भोसले याचा व त्याचे आई वडील यांचा सत्कार करण्यात आला. 

या सत्कार समारंभास शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भोसले,मुख्याध्यापक साईनाथ रामोड, सहशिक्षक गंगाधर लोखंडे, सुर्यकांत खानापूरकर, हिरामण वैद्य, नारायण भोसले, सुंदर भोसले, गंगाराम भोसले, प्रल्हाद भोसले, गोविंद भोसले, पुरभाजी भोसले, द्रौपदी भोसले यांच्या उपस्थितीत श्रेया परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप करण्यात आले. समारंभ प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद  शाळेतील शिक्षकांनी गुणवत्तेवर भर द्यावा असे मत जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या