🌟शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले निषेधार्थ आंदोलन🌟
फुलचंद भगत
वाशिम : काश्मिर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने आज दि.१८ जुलै रोजी शहरातील पाटणी चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
काश्मिर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. हे केवळ केंद्र सरकार च्या भूमिकेमुळे होत आहे. केंद्र शासनाचे दशहतवाद मोडून काढण्यास अपयशी ठरत आहे. याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरातील पाटणी चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी आंदोलनकांनी केंद्र शासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनात माणिक देशमुख, गजानन भांदुर्गे, बालाजी वानखेडे, रवि पाटील राऊत, गजानन जोगदंड, नंदूभाऊ भोयर, नानाभाऊ देशमुख, मनोज चौधरी, नामदेव हजारे, राम पाटील डोरले, राजाभैय्या पवार, निलेश पेंढारकर, विजूभाऊ मानमोठे, सतिष खंडारे, आनंदा काळे, साबीर मिर्झा, गजूभाऊ ठेंगडे, आशीष इंगोले, राजूभाऊ धोंगडे, दिपक वानखेडे, शामभाऊ दळवी, ज्ञानेश्वर थोरात, गणेश पवार, बालू जहिरव, गणेश गाभणे, रवि पाटील, नितीन जताडे, विष्णू इंगळे, रामकृष्ण माऊली, उद्धव महाराज खंदारे, पुरुषोत्तम जाधव, अनिल मानमोठे, किशोर थोरात, महादेव कांबळे आदींसह मोठ्यासंख्येने शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.....
0 टिप्पण्या