🌟मंगरूळपीर तालुक्यातल्या गोगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तंबाखू नियंत्रण कार्यक्रम संपन्न🌟
फुलचंद भगत
वाशिम :- वाशिम जिल्हा रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षातर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १५ जुलै २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोगरी ता.मंगरूळपीर येथे शालेय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तंबाखु नियंञणासाठी तज्ञांनी मत व्यक्त केले.
या वेळी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू जन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे मानवी शरिरावर होणारे दुष्परिणाम,तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा २००३ ) याद्वारे शालेय विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना तंबाखू जन्य पदार्थ व्यसना पासून दूर कसे ठेवता येईल या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.समाजातील तंबाखू जन्य व्यसनाची तीव्रता त्याचे प्रकार व त्यामुळे होणारे मुख कर्करोग व त्याची प्राथमिक लक्षणे व व्यसन सोडविण्यासाठी असलेल्या उपाय योजना या बाबत मानस शास्त्रज्ञ राम सरकटे यांनी मार्गदर्शन केले.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बी.डी.इंगोले यांनी समाजातील व्यसनाची तीव्रता कमी करण्यासाठी व व्यसन मुक्त सुदृढ भावी युवा पिढी घडविण्यासाठी शालेय स्तरावरील उपक्रम हे प्रभावी माध्यम आहे असे मत व्यक्त केले.
0 टिप्पण्या