🌟वाशिम जिल्ह्यात महसूल चे कामकाज ठप्प;महत्वाच्या कामांना खोळंबा.....!


🌟शासकीय कामासाठी नागरीकांना होत आहे ञास🌟

फुलचंद भगत

वाशिम :- महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात शासन स्तरावर कुठलीहि सकारात्मक चर्चा होत नसल्यामुळे व मागण्या मान्य होत नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील महसूल कर्मचारी यानी दिनांक 15 जुलै 2024 पासून बेमुदत कामबंद आंदोलन महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी महाले यांचे नेतृत्वात सुरु केले आहे.

                महसूल  कर्मचाऱ्यांच्या दांगट समितीनुसार आकृतीबंध मंजूर करणे, महसूल सहायकाची वेतनश्रेणी सुधारणे, अ का सन्वर्गाचे नामकरण करणे व इतर अनुषंगिक मागण्याकरिता महसूल कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत. सदर आंदोलनात कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि महाले, कोषाध्यक्ष रवी अंभोरे, सचिव सचिन भारसाकळे, उपाध्यक्ष संदीप काळबांडे महसूल कर्मचारी, महसूल कर्मचारी श्री वाडेकर, श्री साळसुंदर, श्री आवटे श्री समाधान शेरे, अतुल देशमुख श्री गरुड श्री अनिल घुगे श्री प्रमोद वानखेडे अमित चव्हाण रवी दुबे संतोष वंजारे गजानन उगले ज्ञानेश्वर अवधूत अनंता रोकडे आनंद आरु अनंत रोकडे गोरख इडोळे दत्ता धनगर श्रीकांत वडोदे श्री शरद भाग्यवंत गजानन कुराडे श्री नालट माधवराव शिंदे शंकर शिंदे धनंजय कांबळे संदीप ठाकरे विनोद मारवाडी सचिन मोरे सतीश माडेवर विनोद पाचपिल्ले संतोष भैरवार श्री खंडारे अमित किल्लेदार श्रीमती सीता राऊत शितल ठोकळ सुवर्णा सुर्वे रचना परदेशी, श्रीमती देशमुख , इत्यादी महसूल कर्मचारी उपस्थित कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत.

* महसूल कर्मचारी संपावर ठाम :- 

महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 15 जुलैपासून महसूल कर्मचार्यान्चे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. वास्तविकता महसूल विभाग हा प्रशासनाचा कना असून सुद्धा महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत. मात्र सदर मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये आकृतीबंध व इतर अनुषंगिक महत्त्वाच्या मागण्या आहेत. सदर आंदोलनामुळे नागरिकांची कामे निश्चितच प्रलंबित आहेत परंतु त्याचप्रमाणे प्रशासनाचा कणा असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावरून मंजूर होणे हेदेखील तेवढेच आवश्यक आहे. महसूल कर्मचार्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत महसूल कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

-  रवि महाले, जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी सन्घतना वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या