🌟पुर्णा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा सेवक मारोती पावडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तिव्र निषेध....!


🌟सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून आरोपीला मोका लावण्याची मागणी🌟 

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज सोमवार दि.२२ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालूक्यातील असोला ढोबळे येथील जेष्ठ मराठा सेवक मारोती पावडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालूक्यातील असोला ढोबळे येथील गुंड प्रवृत्तीचा गुन्हेगार वाळू माफीया ज्याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला शिवसेना शिंदे गटाचा तालूका प्रमूख बालाजी नागरे याने जेष्ठ मराठा सेवक मारोती पावडे यांच्यावर गावठी पिस्तूलातून‌ गोळी झाडून जिवघेणा भ्याड हल्ला केला होता या घटनेमुळे सकल मराठा समाजात संताप व्यक्त होत असून वाळू माफीया भ्याड हल्लेखोर बालाजी नागरे व‌ त्याचे सहकारी यांच्या विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत तात्काळ कार्यवाही व्हावी तसेच मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या बदनामीच्या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणारे हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराटे व‌ बिट जमादार सांगळे यांची खातेनिहाय चौकशी करून सबंधितावर गुन्हा दाखल करावा व हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण अवैध बंद करुन बालाजी नागरे याचे मोबाईल कॉल डिटेल्स काढून त्यास मदत करणाऱ्या राजकीय पिल्लावळीचा शोध‌ घेवून त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी आरोपी नांगरे याच्या जवळ पिस्तूल‌ कुठून आला ?याचा तात्काळ शोध घ्यावा व प्राणघातक हल्यात गंभीर जखमी असलेल्या मराठा सेवक मारोती पावडे यांना ५ लाख रुपये आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी,गोळीबार झालेल्या कुटूंबीयावर आणि असोला गावकऱ्यांवर दाखल झालेल्या खोट्या तक्रारी,  दरोडा, जबरीचोरी, कलम अंतर्गत दाखल केलेले गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावे आदी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा जिल्हाभर सकल मराठा समाजाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या