🌟जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) गटास मोठा धक्का🌟
परभणी (दि.24 जुलै 2024) : परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या पदार्पणापासून सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील शाखा प्रमुख ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख या पदापर्यंत विविध जबाबदार्या सांभाळणारे शिवसेना (उबाठा) पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते मधुकर मारोतराव निरपणे यांनी आज गुरुवार दि.25 जुलै रोजी ठाकरे गटास अखेरचा सप्रेम जय महाराष्ट्र करीत राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांच्या साक्षीने शिवसेनेत प्रवेश केला.
सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील निरपणे यांनी शिवसेनेच्या या जिल्ह्यातील प्रवेशापासूनच एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून कामास सुरुवात केली. 1986 ते 1989 पर्यंत ते निमगाव शाखा प्रमुख, 1989 ते 1993 पर्यंत शिवसेनेचे सर्कल प्रमुख तर 1993 ते 2006 पर्यंत शिवसेनेचे सोनपेठ तालुका प्रमुख व 2006 पासून उपजिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते. एक कट्टर आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून निरपणे यांची पक्षासह या जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात ओळख राहिली आहे. तब्बल 36 वर्षे पक्षाच्या विविध कार्यक्रमात, आंदोलनात निरपणे यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली.
दरम्यान, निरपणे यांनी गुरुवारी दि.25 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या साक्षीने मुंबईत एका छोटेखानी कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला......
0 टिप्पण्या