🌟शेतीशाळेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे निरोगी व सशक्त पिक जोपासणे साठी शेतकरी यांना मार्गदर्शन करणे होय🌟
परभणी :- परभणी तालुक्यातील मौजे मुरुंबा येथे दि.२७ जुलै २०२४ रोजी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादन वाढ व मुल्य साखळी विकास प्रकल्पांतर्गत तालुका कृषि अधिकारी नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शना खाली सोयाबीन पिकाची शेतीशाळा वर्ग प्रगतशील शेतकरी पांडुरंग विश्वनाथ बोबडे यांच्या शेतात घेण्यात आले.
शेतिशाळेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे निरोगी व सशक्त पिक जोपासणे साठी शेतकरी यांना मार्गदर्शन करणे. यामध्ये शेतकरी यांना फक्त शिकवणे हा उद्देश नाही तर शेतकरी यांना कर्यक्रमामध्ये सामावुन घेणे हा उद्देश आहे. किडीच्या नैसर्गिक शत्रूंचे अर्थात आपल्या मित्र किटकांचे संवर्धन करणे. नियमित पणे निरीक्षणे घेणे, निरिक्षणा वर आधारित निर्णय घेणे आणि शेतकरी यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेणे. शेतकरी यांना एकात्मिक पिक व्यवस्थापन आणि किड/रोग व्यवस्थापन यामध्ये तज्ञ बनविणे. शेतकरी समूह एकत्र येणे आणि त्यांच्या गरजांवर आधारित कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम राबवणे असे उद्देश आहे.
* संकल्पना :-
शेतीशाळा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात पिकांचा आणि शेतीपद्धतीचा अभ्यास करण्यास शिकवणे. शेतीसंदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्या व त्यावरील उपाय स्थानिक पातळीवरच शोधण्याचा प्रयत्न करणे, सोयाबीन पिकांवर उद्भवणारे कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच त्यांच्या नियंत्रणाच्या उपाययोजना यांच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचविणे, सदर उपायांचा अवलंब करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य शेतकऱ्यांना प्रदान करणे इ. या उद्देशाने शेतीशाळांचे आयोजन करणे महत्वाचे आहे. प्रयोगशील शेतकरी व प्रक्षेत्र, शेतकऱ्यांचा गट, तंत्रज्ञान/अभ्यासक्रम , प्रशिक्षण साहित्य आणि अत्यावश्यक निविष्ठा हे शेतीशाळेचे प्रमुख घटक आहेत.
सदर शेतीशाळेत शेतकऱ्यांना सोयाबीन पिक परिसंस्था निरीक्षणे, विविध कृषि विभागातील योजना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन,सोयाबीन बीजोत्पादन, विद्राव्य खते सोयाबीन मधील विविध किडी व त्यांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन,सांघिक खेळ यातून संदेश मित्र कीटक शत्रू कीटक,कामगंध सापळे उपयोग व व्यवस्थापन अश्या विविध विषयांवर शेतीशाळा घेण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी कृष्णा रेंगे, कृषि पर्यवेक्षक रजनीकांत देशमुख,कृषि सहाय्यक प्रशांत ढोके, राजकिरण नरवाडे आदींनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती......
0 टिप्पण्या