🌟परभणी जिल्हा पोलिस दलातील भरतीसाठी १९ जूलै रोजी लेखी परिक्षा....!


🌟लेखी परिक्षेत पात्र उमेदवारांना प्रवेशपत्रातील सूचनांचे पालन करुन परिक्षेच्या ठिकाणी सकाळी आठ वाजता उपस्थित रहावे🌟

परभणी (दि.१५ जुलै २०२४) :- परभणी जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई या पदाच्या भरती प्रक्रियेत शुक्रवार दि.१९ जूलै२०२४ रोजी जिल्हा पोलिस दलाने लेखी परिक्षा आयोजित केली आहे.

              जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने प्रेसनोट द्वारे दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयात दि.१९ जूलै २०२४ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत या लेखी परिक्षा होणार आहेत. लेखी परिक्षेत पात्र उमेदवारांना प्रवेशपत्रातील सूचनांचे पालन करुन परिक्षेच्या ठिकाणी सकाळी ०८.०० वाजता उपस्थित रहावे लागणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या