🌟पुज्य भदंत दिपंकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे वाचणास सुरुवात🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली:- नागसेन सांस्कृतिक व क्रीडा समिती चिखली द्वारा संचालित नागसेन बुद्ध विहार येथे नेहमी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आषाढ महिन्यापासून पवित्र वर्षावासास सुरुवात होत असते. त्याच अनुषंगाने या कालावधी मध्ये दि २१ जुलै २०२४, आषाढ पौर्णिमेपासून नागसेन बुद्ध विहार जाफ्राबाद रोड राजे संभाजीनगर चिखली येथे पुज्य भदंत दिपंकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे वाचणास सुरुवात झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की जगात गुरुपौर्णिमा अर्थात आषाढी पौर्णिमा आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान पेरले. याच दिवसापासून बुद्ध धम्मातील पवित्र तीन महिन्यांच्या वर्षावासाला सुरवात होते. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या काळात जगातील प्रत्येक बुद्धविहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन करण्यात येते. त्याचप्रमाणे त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ, धम्मदेसना, उपोसथ विधी आदी धार्मिक कार्यक्रम केले जातात.
त्यानिमित्त सकाळी परिसरातील बहुसंख्य उपासकांच्या उपस्थितीत, विलास जाधव (डि.ओ. एस.एस.डि. चिखली) यांच्या नेतृत्वात, संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव मोरे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करून धम्म ध्वजाला मानवंदना देण्यात आली. नंतर सामुहिक वंदना घेण्यात आली. संध्याकाळी संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव मोरे, बी.बी. साळवे, एस.एस. मघाडे, टी.एस. खरात, बी.बी. गवई, आर.एस. जाधव, व्ही.के. डोंगरदिवे, संगीताताई लहाने यांच्या हस्ते पुज्य भदंत दिपंकर यांना विधिवत चिवर देण्यात आले. नंतर पुज्य भदंत दिपंकर यांनी अधिष्ठान ग्रहण करून वर्षावासास सुरुवात केली. आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत नागसेन सांस्कृतिक व क्रीडा समिती चिखली द्वारा संचालित नागसेन बुद्ध विहार येथे पुज्य भदंत दिपंकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन ग्रंथाचे वाचन दररोज रात्री ०८ ते ०९ या वेळेत होणार आहे. तर दररोज सकाळी ०५ ते ०६ या वेळेत ध्यान साधना (मेडिटेशन) होणार आहे.
कार्यक्रमासाठी डॉ. गजानन जाधव, अरविन्द गजभिये, प्रेमानंद गवई, डॉ. सुभाष राऊत, दयानंद निकाळजे, लक्ष्मण पाईकराव, गवई बाबा, जाधव बाबा, आर.जी. जाधव, एल.आर खरात, तायडे सर, बबन चव्हाण, पवार साहेब, मिलिंदकुमार मघाडे, विरसेन साळवे, पंकज जाधव, विकास मघाडे, हर्षवर्धन साळवे, स्वप्नील जाधव, विशाल लहाणे यांनी श्रमदान केले. उज्वला गजभिये, मधुमिता गवई, संगीता लहाणे, मधुबाला राऊत, सिंधु जाधव, रंजना बोर्डे, नलिनी जाधव, अनुराधा जाधव, नंदा जाधव, रत्नमाला डोंगरदिवे, दुर्गा चव्हाण, सुमन साळवे, सरिता खरात, मथुरा खरात, सविता तायडे, अरुणा निकाळजे ई. महिलांनी सुबक अश्या रांगोळी काढून परिसराची व कार्यक्रमाची शोभा वाढविली.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या