🌟खर्‍या अर्थाने शाळाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करते - पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी


🌟मराठवाडा हायस्कुलमध्ये कारगील विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले🌟 


परभणी (दि.26 जुलै 2024) :- शालेय जीवनात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होते. तसेच शिस्त व गुरूंचे महत्त्व शिकविल्या जाते. खर्‍या अर्थाने शाळाच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करते, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले.

          कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.26) शिवाजी नगरातील एनव्हीएस मराठवाडा हायस्कुलमध्ये सेमी इंग्रजी विभागाच्या वतीने नवनिर्वाचीत विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली. यावेळी पदाधिकार्‍यांना पद व गोपनियतेची शपथ देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, प्राचार्य तथा संस्थेचे सहसचिव अनंत पांडे, पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील, सुनील रामपुरकर आदींची उपस्थिती होती. यावेळी जोशीयांनी विद्यार्थी जीवनात लोकशाहीचा पाया दृढ करणे व देशप्रेमी नागरीक निर्मितीसाठी हे उपक्रम आयोजित केले जातात, असे सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. कारगिल युध्दात देशासाठी बलिदान देणार्‍या शूरवीरांची गाथा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत विद्यार्थ्यांच्या समोर मांडली.

             कार्यक्रमाची सुरूवात कु. प्रांजल बोधक हीने सादर केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या देशभक्तीपर गिताने झाली. तिला धानोरकर  यांचे मार्गदर्शन लाभले. तर कारगिल विजयाची माहिती सांगणारे सुंदर भित्तीपत्रक कु. मोक्षदा गरुड हिने तयार केले. तिला श्रीपाद कुलकर्णी व गोपाळ रोडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी कु. मोक्षदा लक्ष्मीकांत गरुड हीने संस्कृत, उपाध्यक्षा अनघा महेश मनुरे हीने मराठीमधून, सचिव कु. पूर्वा गायकवाड हीने इंग्रजीतून, सहसचिव अन्वी अमोल देशपांडे हिने हिंदीतून तर विद्यार्थी प्रतिनिधी अश्‍वजीत राहुल वाहिवळ याने मराठीतून पद व गोपनियतेची शपथ घेतली. सर्व नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

          प्रास्ताविक प्राचार्य पांडे यांनी केले. सुत्रसंचलन विश्‍वास दिवाळकर यांनी केले तर आभार श्रीपाद कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी संसदेचे सल्लागार श्रीपाद कुलकर्णी, अभिजीत कुलकर्णी, अविनाश कंधारकर, डॉ. सुनील तुरुकमाने गोपाळ रोडे, शिवप्रसाद कोरे, वसंत पुरी, सौ. विद्या सोनूने, सौ. चव्हाण, सौ. दिपाली जोशी, सौ. कल्पना खटिंग, राजेश उफाडे, सौ. गरुड, नितीन बिरादार, गणेश सूर्यवंशी आदींनी प्रयत्न केले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या