🌟चिखलीतील निराधार वृद्धाला मिळाला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचा आधार.....!


🌟यावरून लक्षात येते कि आजही खूप निराधार वृद्ध आहेत परंतु त्यांना वृद्धाश्रमाची माहिती🌟

✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एका गावातील वृद्ध त्यांना पोटचे तीन मुल असून ते आपल्या जन्म दात्याचा सांभाळ करीत नसल्याने ते वृद्ध निराधार झाले. त्यांना मुलगी नाही व पत्नी सुद्धा नाही त्यांना कोणताच आधार नाही त्यांची तीनही मुलं आप आपल्या संसारात व्यस्त असल्यामुळे वृद्ध आजोबा गावातच रोज भटकंती करून आपला उदरनिर्वाह करीत होते. परंतु निराधार लोकांची निःस्वार्थ पणे सर्व प्रकरची मोफत सेवा देणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर च्या बाबतीत त्यांना माहिती मिळाली. म्हणून ते चिखली आले असता त्यांची भेट सामाजिक कार्यकर्ते अमोल रमेश देवकर, रामभाऊ भुसारी व भरत जोगदंडे यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्या निराधार वृद्ध आजोबांनीं सर्व आपबिती या सर्वांना सांगितली लगेच तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना संपर्क करून निराधार वृद्ध आजोबांना वृद्धाश्रमात प्रवेश देण्यास विनंती केली. यावरून आश्रमची पूर्ण कागदोपत्री कारवाई करून सदर निराधार वृद्धाची माहिती चिखली पोलीस मध्ये देऊन तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देण्यात आला आहे.

यावरून लक्षात येते कि आजही खूप निराधार वृद्ध आहेत परंतु त्यांना वृद्धाश्रमाची माहिती नसल्याने ते आजही भटकंती करीत आहे. असे निराधार वृद्ध आजी आजोबा, विधवा, घटस्फोटीत महिला व अनाथ बालके कुठे हि निदर्शनास आल्यास कृपया आमच्याशी संपर्क करावा किंवा थेट मानवसेवा प्रकल्पच्या हेल्प लाईन नंबर 8855850378 वर संपर्क करावा असे आवाहन या वेळी भरत जोगदंडे यांनी केले आहे. प्रशांत डोंगरदिवे व  भरत जोगदंडे  यांनी आज निराधार वृद्ध आजोबाला वृद्धाश्रमात प्रवेशित करून एक चांगले सामाजिक कार्य केले आहे त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या