🌟पुर्णेतील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे ? आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही गैरहजेरी.....!


🌟शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची प्रचंड हेळसांड🌟


पुर्णा (दि.२९ जुलै २०२४) :- पुर्णा तालुक्यातील ग्रामीण रुग्णांसह शहरी भागातील सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी एकमेव आधार असलेल्या पुर्णा-ताडकळस राज्यमार्गावरील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील अनियंत्रित कारभार रुग्नांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत असून पुर्णा शहरापासून जवळपास दोन/तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी येण्यासाठी प्रति व्यक्ती शंभर ते सव्वाशे रुपये खर्च करुनही रुग्णालयात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी वेळेवर उपचार होईल याची शाश्वती नसल्याने अनेक रुग्णांची अक्षरशः हेळसांड होत असल्याचा गंभीर प्रकार आज सोमवार दि.२९ जुलै २०२४ रोजी दुपारी १२.३० ते ०४.०० वाजेपर्यंत शासकीय ग्रामीण रुग्णालयात एक सुरक्षा कर्मचारी वगळता एकही आरोग्य अधिकारी/आरोग्य परिचारिका तसेच एकही आरोग्य सेवक उपस्थित नसल्याने अनेक रुग्ण उपचाराअभावी तळमळतांना पाहावयास मिळाले.


पुर्णा शासकीय ग्रामीण रुग्णालयात मुख्य तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह अन्य आठ ते नऊ आरोग्य अधिकारी कार्यरत असून देखील आज सोमवारी एकही आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याचे पाहावयास मिळाले आरोग्य अधिकारीच नव्हें तर रुग्णालयात आरोग्य परिचारिकांसह कंपाउंडर देखील उपस्थित नसल्याचा गंभीर प्रकार आज समोर आला यावेळी शासकीय ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी निदान एकतरी आरोग्य अधिकारी/आरोग्य परिचारिका उपस्थित राहाणे आवश्यक होते परंतु ग्रामीण रुग्णालयातील सर्वच आरोग्य अधिकारी आपल्या कर्तव्याशी दगाबाजी करीत अनुपस्थित असल्याचे दिसून आले याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे निदान आलेल्या रुग्णांवर प्रथमोपचार करण्याच्या दृष्टीने औषधी काऊंटर तरी उघडं असायला हवं होतं परंतु औषधी काऊंटर देखील यावेळी बंद असल्याचे दिसून आले. 


शासकीय ग्रामीण रुग्णालयातील औषधी काउंटर बंद,वैद्यकीय अधिकारी तपासणी कक्ष बंद,जखमी रुग्णांची मलमपट्टी करण्यासाठी असलेले कक्ष बंद,रक्त/लघवी तपासणी कक्ष बंद, एक्सरे क‌क्ष बंद मग शासकीय ग्रामीण रुग्णालय बंद आहे की चालू ? असा प्रश्न रुग्ण एकमेकांना विचारतांना देखील पाहावयास मिळाले पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची अवस्था फार बिकट झाल्याचे आज पाहावयास मिळाले शासकीय ग्रामीण रुग्णालयात एकही आरोग्य अधिकारी आरोग्य परिचारिका उपस्थित नसल्याचे पाहून अनेक रुग्णांनी नाईलाजास्तव आपला मोर्चा शहरातील खासगी रुग्णालयांकडे वळवल्याचे देखील आज पाहावयास मिळाले शासकीय ग्रामीण रुग्णालयात यापुढे उपचारासाठी जायचे का नाही असा संभ्रम देखील आता ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांमध्ये निर्माण झाला असून शासकीय ग्रामीण रुग्णालयातील कारभार आज एकंदरीत अनियंत्रित झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला.

शासकीय ग्रामीण रुग्णालय पुर्णा या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह अन्य आठ ते नऊ आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून एका आरोग्य अधिकाऱ्याची प्रत्येकी आठ तास ड्युटी लावण्यात आली आहे या आठ तासात तीन डॉक्टर नेमलेले आहेत तरी सुद्धा रुग्णालयाचा कारभार आरोग्य अधिकारी/आरोग्य परिचारिकांअभावी राम भरोसे चालत असल्याचं आज पाहावयास मिळाल...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या