🌟मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेने केली मागणी🌟
परभणी (दि.23 जुलै 2024) : लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त 1 ऑगस्ट रोजी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेने केली आहे दरम्यान, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे नेते राधाजी शेळके यांनी आज मंगळवार दि.23 जुलै रोजी मुंबईत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली व या मागणीसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या लहुसैनिकांनी दिलेल्या रक्तांच्या सह्यांच्या निवेदनाची प्रत सादर केली. यावेळी बावनकुळे यांनी आपण तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन 1 ऑगस्ट रोजी डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी सुट्टी देण्याची शिफरस करु, असे आश्वासन दिले.
गेल्या 25-30 वर्षांपासून लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने सातत्याने रास्ता रोको आंदोलन, मोर्चे, मेळावे, अधिवेशने करण्यात आली. याच अनुषंगाने दि. 18 जुलैला छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लहुसैनिकांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी देण्यात यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासाठी रक्तांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले होते.याच निवेदनाची प्रत मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे यांना देण्यासाठी राधाजी शेळके व शिवाजी शेळके हे मुंबईस गेले होते. यावेळी त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली, चर्चा केली व आपल्या मागणी संदर्भातील निवेदन सादर केले......
0 टिप्पण्या