🌟कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुराधा ढालकरींनी केले🌟
परभणी (दि.३१ जुलै २०२४) : राज्यात सर्वत्र महसूल विभागामार्फत गुरुवार दि.०१ ऑगस्ट पासून ‘महसूल दिना’ सोबतच ‘महसूल पंधरवडा’ सुरू होत आहे या पंधरवड्यामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात आता बुधवार दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम अगोदर शुक्रवार दि.०५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता.
त्यामुळे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक व माजी सैनिक विधवा, पत्नी यांच्या महसूल विभागाकडे प्रलंबित असलेली शेतीविषयी तसेच पोलीस तक्रारी असतील तर त्यांचा निपटारा करण्यात येणार आहे. तरी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परभणी यांच्याकडे 8ऑगस्टपर्यंत जमा करावेत तसेच १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले आहे......
0 टिप्पण्या