🌟सदरील कार्यगौरव अक्षदा मंगल कार्यालय परभणी येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला🌟
परभणी (दि.23 जुलै 2024) : 17 परभणी लोकसभा मतदार संघात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक-2024 प्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न झाली. परभणी मतदार संघामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न व शांततापूर्वक वातावरणात पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 17-परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेत परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, परतूर आणि घनसावंगी या विधानसभा मतदार संघातील उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा येथील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे,पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी आणि मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून कार्यगौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले की आपण सर्वांनी केलेल्या सांघिक कार्यामुळे आपण लोकसभा निवडणूक ही शांततेत यशस्वीरित्या पार पाडली आहे. यामुळे आपला सर्वांचा आत्मविश्वास वाढला आहे. ज्याप्रमाणे आपण लोकसभा निवडणूक यशस्वी पार पाडली त्याच प्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणूक देखील आपण सांघिकरित्या एकत्र येवून नक्कीच यशस्वीरित्या पार पाडू यावेळी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, उपजिल्हाधिकारी (पु.) संतोषी देवकुळे, परभणी उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे,गंगाखेड उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, पाथरी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी,सेलू उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) डॉ. संदीप घोन्सीकर, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती प्रास्ताविक निवडणूक उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. तत्पूर्वी विविध सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर निवडणुकीच्या यशस्वी आयोजनाबाबतची निवडणूक विभागाकडून तयार केलेली चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कुंडीकर यांनी केले.....
0 टिप्पण्या