🌟पुर्णा शहरातील श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या कुलगुरूंची भेट....!


🌟यावेळी कुलगुरू डॉ.मनोहर चासकर डॉ.मनोहर चासकर यांनी महाविद्यालयातील अनेक विषयांवर चर्चा केली🌟 

पुर्णा (दि.१९ जुलै २०२४) - नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी आज शुक्रवार दि.१९ जुलै २०२४ रोजी पुर्णा शहरातील श्री.गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालयास भेट दिली.

यावेळी कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी महाविद्यालयातील तासिका,प्राध्यापकांचे (NEP2020) विषयीची तयारी यासह प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम यावर चर्चा केली तसेच त्यांनी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण समजून सांगण्यासाठी व्यापक तयारीची आवश्यकता विशद केली. मा.कुलगुरू यांनी सर्व प्राध्यापकांशी वैयक्तिक पातळीवर प्रश्न उत्तर करून नवीन शैक्षणिक धोरणाविषयी अधिकाधिक माहिती घेतली यावेळी महाविद्यालय स्तरावर या धोरणाविषयी कितपत तयारी आहे यासंबंधी चर्चा केली .यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा गोविंदराव कदम उपप्राचार्य डॉ.शिवसांब कापसे, महाविद्यालयीन प्राध्यापक यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या