🌟वेळीच निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील झिरो टी पॉईंट आणि माटेगांव येथील नदीवरील पूल पाडून नवीन पुलाचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरु केल्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. नांदेड व परभणीला जोडणारा हा एक प्रमुख रस्ता आहे तसेच बऱ्याच खेडेगावाना पूर्णा शहराशी जोडणारा एकमेव रस्ता आहे. पावसाचे पाणी संबंधित ठिकाणी तुंबले तर पूर्णतः वाहतूक कोंडी होणार आहे. या गोष्टीचा इशारा आज डी वाय एफ आय या युवा संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील कार्यालय पूर्णा यांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. मोठा पाऊस होण्या आधी व ही समस्या निर्माण होण्या आधी दोन्ही पुलांचे बांधकाम पूर्ण करून रस्ते त्या त्या ठिकाणी रस्ते नीट तयार करावेत असे निवेदनात म्हटले आहे. वेळीच यावर उपाय नाही केला व त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला तर डी वाय एफ आय कडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर राज्य सहसचिव नसीर शेख, तालुका समिती सदस्य प्रबुद्ध काळे, म. फुले व डॉ. आंबेडकर नगर समिती अध्यक्ष अमोल पट्टेकर, सचिव सुबोध खंदारे आणि धम्मानंद जोंधळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या