🌟नांदेड येथील गुरुद्वारा अखंड पाठ घोटाळा प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल.....!


🌟अधिक्षक ठाणसिंघ बुंगई यांच्यासह चौघांचा समावेश🌟

 नांदेड (दि.१६ जुलै २०२४) - सचखंड गुरुद्वारा बोर्डातील अखंड पाठ विभागामध्ये वर्ष 2016 ते 2019 दरम्यान अखंड पाठ घोटाळा उघडकीस आला आहे. जगदीपसिंघ नंबरदार यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यामध्ये प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगई  याच्यासह चार आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     जागतिक ख्यात कीर्तीच्या सचखंड गुरुद्वारा येथे अनेक भाविक त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याच्यानंतर अखंड पाठचे आयोजन करतात. त्याकरिता अखंड पाठ विभाग गुरुद्वारामध्ये कार्यरत आहे. या अखंडपाठ विभागात वर्ष 2016 ते 19 च्या दरम्यान अनेक जणांनी अखंड पाठाचे आयोजनाकरिता आवश्यक रक्कम भरणा केली होती. परंतु सदर रक्कम अखंड पाठाचे आयोजन न करता अपहार करण्यात आला असल्याने याबाबत अनेक नागरिकांनी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष व प्रशासकांकडे वारंवार तक्रारी केल्याने चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीच्या अहवालानुसार 2016 ते 19 च्या दरम्यान अखंड पाठ विभागात सुमारे 36 लाख 69 हजार 350 रुपयाची अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले. 

     याबाबत जगदिपसिंघ नंबरदार यांच्या फियादीवरून वजीराबाद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. - 330/ 2024 अन्वये कलम - 420, 406, 34 भादंवि प्रमाणे गुरुद्वारा बोर्डातील अखंड पाठ विभागातील क्लार्क महिपालसिंघ कृपालसिंघ लिखारी,रा. नंदिग्राम सोसायटी नांदेड, हेड क्लार्क धरमसिंघ मोहनसिंघ झिलदार, रा.बडपुरा नांदेड, सुपरवायझर रवींद्रसिंघ हजुरासिंघ सुखई, रा.अबचलनगर नांदेड व तत्कालीन प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ जीवनसिंघ बुंगई रा. चिखलवाडी नांदेड यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या