🌟पुर्णेत आर्य वैश्य महासभेच्या वतीने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण...!


🌟येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात उद्या मंगळवार दि.३० जुलै रोजी सकाळी ०७.०० वाजता वृक्षारोपणाचे आयोजन🌟 


 पुर्णा (दि.२९ जुलै २०२४) महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुर्णा तालुका आर्य वैश्य महासभेच्या वतीने उद्या मंगळवार दि.३० जुलै २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील वृक्षारोपण पूर्णा-झिरोफटा-परभणी राज्यमार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात उद्या मंगळवार दि.३० जुलै रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास करण्यात येणार असून वृक्षारोपणानंतर अल्पोहराचे देखील आयोजन करण्यात आले आहे या वृक्षारोपण सोहळ्यास शहरासह तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक व्यापारी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच वृक्षप्रेमी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुर्णा तालुका आर्य वैश्य महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.......

                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या