🌟तांत्रिक कामगार युनियनची मागणी🌟
नागपूर - राज्य शासनाने महावितरण वीज ग्राहक व कंपनीच्या हिताकरिता स्मार्ट मीटर लावण्याची घोषणा केली आहे सदर स्मार्ट मीटर सर्वप्रथम राज्यातील लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचारी यांना लावण्यात यावे अशी मागणी तांत्रिक कामगार युनियन ने राज्याचे ऊर्जामंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या स्मार्ट युगात महावितरण कंपनीमध्ये नव-नविन तंत्रज्ञात वेळोवेळी स्विकृत करून सुधारणा करण्यात येत आहे. अशा ग्राहक व कंपनीहिताच्या निर्णयामध्ये संघटना सातत्याने सकारात्मक भुमिकेतुन स्वागत करीत असते.
महावितरच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. राज्याचा झपाटयाने होणारा औद्योगिक विकास आणि त्यामुळे होणारे शहरीकरण लक्षात घेता भविष्यात विजेच्या मागणीचे नियोजन व्हावे, ग्राहकांना अपघातविरहीत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी योजना राबविण्यात येत आहे. यात ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मिटरिंग करण्यात येणार असल्याचे घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनानी विरोध केल्यानंतर सदरहु स्मार्ट मिटर हे फक्त सब स्टेशनमधील सर्व फिडर, वितरण ट्रान्सफॉर्मर, सरकारी कार्यालयांमध्ये व महावितरण कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरी स्मार्ट मिटर बसविण्यात येणार असल्याचे जाहीर केले
आहे. सर्व साधारण ग्राहकांना स्मार्ट मिटर बसविण्यात येणार नाही असे घोषित करण्यात आले आहे. तांत्रिक कामगार युनियन ने स्पष्टपणे निवेदनाद्वारे अग्रेसित करीत , स्मार्ट मिटर मुळे विज बिलापासुन ग्राहकांची सुटका, विज वापरावर नियंत्रण, विज बिलातील त्रुटी दुर, विज चोरीला आळा, ग्राहकांना विजेचा काटकसरीने वापर करण्याला प्रोत्साहन, विज भाराचे व्यवस्थापन तसेच कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासह अनेक बाबी कंपनी हिताच्या होत असल्याने सदरहु स्मार्ट मिटर लावण्याची सुरूवात हि प्रथम राज्यातील लोकप्रतिनधी पासुन सुरवात करावी. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच/सदस्य, पंचायत समिती सदस्य/पदाधिकारी, जिल्हापरिषद सदस्य / पदाधिकारी, आमदार, मंत्री, खासदार, केद्रीय मंत्री व सर्व सरकारी कर्मचारी याचा समावेश करावा. अशी मागणी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर. पवार, सतिश भुजबळ, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवणेचारी, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे, आर. आर.ठाकुर, राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी पारेषण विक्रम चव्हाण, दत्तु भोईर, किरण कऱ्हाळे, प्रकाश वाघ, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, प्रसिध्दी प्रमुख अनिल सरोदे, विक्की कावळे यांनी केली आहे......
0 टिप्पण्या