🌟ट्रक नालीत फसल्याने ट्रक चोरीचा प्रयत्न फसला🌟
फुलचंद भगत
वाशिम :- मंगरुळपीर येथील शनिमंदिरा जवळुन अज्ञाताने दिवसाढवळ्या ट्रक चोरुन नेण्याचा प्रयत्न केला परंतु सदर ट्रक नालीत फसल्याने ट्रक चोरीचा देखील प्रयत्न फसला.यासंदर्भात ट्रकमालक अमोल बाबुलाल रातरोटे वय 35 वर्ष काम ट्रान्सपोर्ट राहणार नविन आठवडी बाजार मंगरूळपीर यांनी मंगरुळपीर पोलीस स्टेशन रितसर तक्रार दाखल केली असुन पोलीस तपास करीत आहेत.
तक्रारीत नमुद आहे की,अमोल सातरोटे जय बजरंग ट्रान्सपोर्ट बिल्डींग मटेरीयल नावाने ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय करतो. माझे जवळ 6 ट्रक आहे. माझे ट्रक शनी मंदीर मंगरूळपीर येथे खाली जागेत उभे राहतात.
दि. 25/07/2024 रोजी सायंकाळी 06.30 वाजता सुमारास मला माझा लेबर दिनेश सुर्यवंशी वय 25 वर्ष रा. संतोषी माता मंदीर झोपडपटटी मंगरूळपीर यांनी मोबाईल फोन ने माहीती दिली की, तुमचा शनी मंदीर जवळील ट्रक क्र. एम.एच 31 डी एस. 0416 पीवळया रंगाचा हा कोणीतरी चोरून घेवुन जात आहे तो ट्रक शनी मंदीर जवळ नालीत फसवला आहे. मी लगेच शनी मंदीर जवळ येवुन पाहणी केली असता माझा ट्रक क्र. एम.एच 31 डी एस. 0416 पीवळया रंगाचा शनी मंदीर समोरील नालीत फसला दिसला व ट्रक मध्ये कोणी ही दिसुन आला नाही.
तरी दि. 25/07/2024 रोजी सायंकाळी 06.30 वाजता सुमारास शनी मंदीर मंगरूळपीर समोर मोकळया जागेत ठेवलेला माझा ट्रक क्र. एम.एच 31 डी एस. 0416 पीवळया रंगाचा कीमत अंदाजे 9,00000 रू हा अज्ञात चोराने शनी मंदीर मंगरूळपीर समोर मोकळया जाग्यावररून चोरून नेला आहे. त्याचे विरूध्द कार्यवाही व्हावी याकरीता मंगरुळपीर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.वृत्त लिहेपर्यत गुन्हा नोंद झाला नव्हता.पुढील तपास पोलिस करीत आहेत......
0 टिप्पण्या