🌟स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त🌟
फुलचंद भगत
वाशिम:-दाट वस्ती मध्ये भर दिवसा व रात्री घरफोडया करणा-या आरोपींचा शोध घेवुन पोलीस स्टेशन. वाशिम शहर येथे दाखल अप.क्र. २३२ / २०२४, पोस्टे मालेगांव अप.क्र.१७४ / २४ पोस्टे अनसिंग अप क ११७/२४ कलम ४५७,३८० भादंवि कलम ४५४,३८० भादंवि च्या गुन्हयातील आरोपी नामे धनंजय दिलीपराव पवार वय ३२ वर्ष २ ) अंकुश राजेश कुलकर्णी वय २२ वर्ष ३ )मुकेश ओमप्रकाश शर्मा वय ३१ वर्ष याने चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ०२ आरोपी अकोला जिल्हया तर ०१ आरोपी विकोळी मुंबई हददीतुन वर नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्या कडुन ३.५० लाख रूपये रक्कमेचे सोन्याचा धातुचा तुकडा ताब्यात घेतल्या त्यावरून पोलीस स्टेशन वाशिम शहर एक गुन्हा पोलीस स्टेशन मालेगांव तसेच पोलीस स्टेशन अनसिंग येथील एक गुन्हा उघड झाला असुन सदर गुन्हयात ३.५० लाख रूपयाचा मुददेमाल जप्त आहेत.
सदर आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन वाशिम शहर मालेगांव व अनसिंग यांचे ताब्यात दिले आहे नागरीकांनी अशा प्रकारचा गैरव्यवहार व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्याची माहीती तात्काळ पोलीस प्रशासनास दयावी असे आवाहान वाशिम जिल्हा पोलीस दला तर्फे करण्यात येत. आहे.सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. रामकृष्ण महल्ले, सपोनि योगेश धोत्रे पोहवा प्रशांत राजगुरू, नापोकॉ ज्ञानदेव म्हात्रे, पोकॉ निलेश इंगळे, अविनाश वाढे, विठठल महल्ले, दिपक घुगे व चालक गजानन जाधव यांच्या पथकाने केली......
0 टिप्पण्या